Maharashtra Weather Update | राज्यातील काही भागात पाऊस ओसरल्याचे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी उन्हाचा तडाखा वाढला असून तापमानात वाढ होत आहे. यादरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून देशभरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील सात दिवस 11 सप्टेंबर ते 16 सप्टेंबरदरम्यान अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. यात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांसह रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट जारी? पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर गडचिरोलीमध्ये विजांचा कडकडाट व मुसळधार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. Maharashtra Weather Update | भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान आणि दिल्लीमध्ये काही भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू -काश्मीर, पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पवासाचा अलर्ट देण्यात आला आहे. तर मेघालय, मणिपूर, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा आणि नागालँडमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. Maharashtra Weather Update | हेही वाचा : ८ वर्षांपूर्वी ज्यांना महाभियोगाद्वारे दूर केले त्यांच्याच हाती देशाची सूत्रे ; वाचा कोण आहेत सुशीला कार्की ?