पुणे जिल्हा | इंदापुरात पावसाची दडी; बळीराजा धास्तावला
Updated On:

लोणी देवकर , (वार्ताहर) – इंदापूर तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाचे जोरदार आगमन झाले होते. यामधे वादळी वार्यासह जोरदार पाऊस बरसला होता; परंतु काही दिवसांनी इंदापूर तालुक्यात पावसाने दडी मारल्याने बळीराजा धास्तावला आहे .
शेतकर्यांनी मान्सूनपूर्व पेरण्या तसेच लागण केल्याने आता त्यांचे लक्ष दमदार पावसाकडे लागले आहे. जर पाऊस असाच लांबला तर उसाला हुमणी लागण्याची शक्यता आहे.
दररोज आकाशात ढग तयार होऊन आता जोरदार पाऊस बरसेल असे वाटते; परंतु पाऊस पडत नसल्याने शेतकरी वर्ग निराश झाला आहे. एकंदरीतच इंदापूर तालुक्यात शेतकर्यांना दमदार पावसाची अपेक्षा आहे.





