मुसळधार पावसाचा ‘लव्ह अँड वार’ चित्रपटाला फटका! सेटचे मोठे नुकसान, भन्साळींनी घेतला मोठा निर्णय

Love and War movie : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित चित्रपट ‘लव्ह अँड वॉर’ चर्चेत आहे. या चित्रपटाविषयीच्या अनेक अपडेट समोर येत असतात. आता या चित्रपटाबाबात एक मोठी अपडेट समोर आली आहे. काही काळासाठी चित्रपटाचे शूटिंग थांबवण्याचा निर्णय या चित्रपटाच्या टीमने घेतला आहे. महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू असून या पावसामुळे चित्रपटाच्या चित्रीकरणाला खीळ बसली आहे. पावसामुळे सेटेचे मोठे नुकसान झाल्याने चित्रपटाचे शूटिंग तात्पुरते थांबविण्यात आले आहे.
या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल यांसारखे दिग्गज कलाकार आहेत. हे कलाकार गेल्या काही काळापासून चित्रीकरणात व्यस्त होते. ‘मिड डे’च्या सूत्रांनुसार, चित्रपटातील एक महत्त्वाचा नाट्यमय सीन आऊटडोअर शूट करायचा होता. या सिनसाठी विशेष प्रकाशयोजनची गरज होती. परंतु, खराब हवामानामुळे हे शक्य झाले नाही. त्यामुळे शुटिंग बंद करण्यात आले.
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे त्यांच्या चित्रपटासाठी कोणतीही तडजोड करत नाहीत. या चित्रपटाच्या सेटवर ५०० हून अधिक युनिट्स कार्यरत असून, काही कर्मचारी दूरच्या भागात राहतात. पावसामुळे वाहतुकीच्या समस्यांमुळे त्यांना सेटवर पोहोचणे कठीण झाले आहे.
View this post on Instagram
या आठवड्याच्या अखेरीस पुन्हा होऊ शकते शुटिंगला सुरूवात
मिळालेल्या माहितीनुसार, या आठवड्याच्या रणबीर आणि विकी यांना चित्रीकरणासाठी वेळ देण्यात आला होता, तर आलियाची या सीनसाठी गरज नव्हती. खराब हवामानामुळे दोघांनीही शूटिंगच्या सेटवरून तात्पुरता ब्रेक घेतला आहे. हवामान पुन्हा पूर्वपदावर आल्यानंतर या आठवड्याच्या अखेरीस चित्रीकरणाला पुन्हा सुरूवात केली जाणार आहे. विकीने चित्रपटासाठी १५ किलो आणि रणबीरने १२ किलो वजन कमी केले आहे.





