पुणेकरांनो काळजी घ्या ! आज जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट ; ताम्हिणी घाट रस्ता बंद

Heavy Rain in Pune । राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या पुण्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरू झाली आहे. सिंहगड रोड संकुलातील अनेक घरांमध्ये पाणी साचले आहे. दरम्यान, आजही पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचे संकेत आहेत. मुसळधार पावसामुळे आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागान येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील शाळा आणि महाविद्यालये आज बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणातून 40 हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी केले आहे. पुण्यात रात्रभर तुफान पाऊस सुरु आहे. या पावसामुळं सगळीकडे पाणीच पाणी झालंय. अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलंय.
मुळशी ताम्हणी घाटात दरड कोसळली Heavy Rain in Pune ।
पुणे जिल्ह्यातील मुळशी ताम्हणी घाट येथे मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं दरड कोसळलेली आहे. रस्ता बंद आहे. पोलीस अधिकारी स्टाफ, तहसीलदार, प्रांत अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली असून दरड काढण्याचे काम सुरु आहे.
ताम्हिणी घाट रस्ता बंद Heavy Rain in Pune ।
आदरवाडी (ता मुळशी) गावच्या या ठिकाणी डोंगराचा कडा hard rock पासून तुटून थेट रस्त्यापर्यंत आला आहे . रस्ता ते डोंगर यामधील अंतर अंदाजे ५०० मी आहे .१० ते १२ फूट उंचीचा मातीचा स्तर रोड पर्यंत आला आहे. रस्त्यावरील दरड स्वच्छ करण्यासाठी किमान ५-६ तास तरी लागतील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.





