पवना धरण परिसरात पावसाची दमदार हजेरी
Updated On:

पिंपरी – पवना धरण परिसरात शनिवारी पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे एका दिवसांत पाणी पातळीमध्ये 3.94 इतकी वाढ झाली आहे. आज (रविवारी) सकाळी सहा वाजता धरणातील पाणीसाठा 28.77 टक्के इतका झाला आहे.
पवना धरण परिसरात शनिवारी (दि. 13) दिवसभरात 132 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर पावसाळा सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत 662 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या धरणात 28.77 टक्के इतका पाणीसाठा आहे. तर गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत 655 मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यावेळी धरणातील पाण्याची पातळी 30.75 टक्के इतकी होती
यंदा 11.34 टक्के वाढ
पावसाळा सुरू होण्यापूर्वी पवना धरणात 17.43 टक्के इतका पाणीसाठा होता. त्यामध्ये आत्तापर्यंत 11.34 टक्के इतका पाणीसाठा वाढला आहे.
टॅग्स:




