मावळ-मुळशीत मुसळधार पाऊस, प्रशासनानं पर्यटकानां केलं ”हे आवाहन..
Updated On:

पुणे : मावळ व मुळशी तालुक्यातील व बाहेर गावावरून तालुक्यामध्ये पर्यटनासाठी येणारे पर्यटक यांना सूचित करण्यात येते की मागील दोन दिवसापासून मावळ व मुळशी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून पावसाची संततधार सतत सुरू आहे.
त्यामुळे धरण क्षेत्रामध्ये तसेच नदीपात्रामध्ये पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे पर्यटनाला येणारे नागरिकांनी भुशी डॅम परिसर, लायन्स पॉईंट, पवना धरण, कुंडमळा परिसर, मुळशी तालुक्यातील धोकादायक पर्यटन स्थळे व इतर धोकादायक ठिकाणी पर्यटनास जाण्याचे कटाक्षाने टाळावे अशा सूचना सुरेंद्र नवले, उपविभागीय अधिकारी मावळ – मुळशी यांनी दिलेल्या आहेत.





