Typhoon Shanshan: शानशान वादळामुळे जपानमध्ये अतिवृष्टी

टोकियो – शानशान वादळामुळे जपानच्या शिन्झाकू प्रांतात अतिवृष्टी सुरू आहे. हे वादळ जपानच्या विविध भागांमध्ये आणकी काही दिवस रेंगाळण्याची शक्यता हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
शानशान वादळामुळे वाऱ्याचा वेग ताशी ६५ मैल इतका असून गुरुवारी हे वादळ समुद्र किनाऱ्यावरून जमिनीवर थडकले. वादळामुळे अनेक भागात भूस्खलन, अतिवृष्टी आणि पूर आला आहे. नैऋत्य जपानमध्ये या वादळामुळे मोठी हानी झाली आहे.
आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. एक जण बेपत्ता झाला असून १२७ जण बेपत्ता झाले आहेत. अनेक घरांची छपरे उडून गेली आहेत. तर पुराच्या पाण्यात वाहने देखील वाहून गेली आहेत.
वादळामुळे हमामात्सू इजू या शहरामधमये दरडी कोसळण्याचा इसारा देण्यात आला आहे. राजधानी टोकियोमध्ये देखील आगामी काळात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
वादळाची संथ गती
शानशान वेदळ अतिशय संथ गतीने पुढे सरकते आहे. यामुळे वादळाच्या मार्गात नसलेल्या होक्कायदो सारख्या बेटावर देखील मोठे नुकसान झाले आहे. क्युश्यू आणि शिकोकू या बेटांना वादळाचा तडाखा पहिल्यांदा बसला होता.
त्यानंतर हे वादळ होन्शू या मुख्य बेटावर पोचले. वादळाची गती इतकी संथ आहे की या वादळाचा मार्ग नक्की काय असेल, याचा अंदाज देखील केला जाऊ शकत नाही.





