मुंबईत पावसाचा जोर कायम; सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना WFHच्या सूचना

Mumbai Rain Update | यंदाही मुंबईची ‘तुंबई’ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईकरांची एकच तारांबळ उडाली आहे. आज मंगळवारी देखील पावसाचा जोर कायम आहे.
यापार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आपत्कालीन कार्यालयाची सेवा सोडून सर्व खासगी कार्यालये आणि आस्थापना यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने महानगरपालिकेकडून आज (मंगळवार 19 ऑगस्ट) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच खाजगी कार्यालयांनाही सुट्टी देण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत.
घराबाहेर न पडण्याचे आवाहन
भारतीय हवामान खात्याने आज मंगळवार, दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई शहर आणि उपनगरात अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित कार्यालये, आस्थापना यांनी कामकाजाच्या स्वरूपानुसार, कर्मचाऱ्यांना घरी राहून काम (वर्क फ्रॉम होम) करण्याच्या सूचना देण्याचे आदेश मुंबई महापालिकेने दिले आहेत. गरज नसेल घराबाहेर पडू नका असं आवाहन पालिकेतर्फे करण्यात आलं आहे.
📢All Government and Semi-Government Offices in Mumbai will remain closed today, 19th August 2025
🔹Private offices / institutions / establishments are advised to instruct their employees to work from home
🌧️The India Meteorological Department has issued a Red Alert today, i.e.…
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 19, 2025
मुंबईतील नागरिक, चाकरमानी अडकून पडू नयेत तसेच कोणाचीही गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वांनी नियमांचे पालन करावे असे आवाहनही महापालिकेतेर्फे करण्यात आले आहे.
शाळा आणि कॉलेजला सुट्टी
याशिवाय मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालये यांना 19 ऑगस्ट 2025 रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई प्रमाणे ठाणे, कल्याण, नवी मुंबई, आणि पालघर जिल्ह्यातील शाळांना ही स्थानिक प्रशासनाने शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. Mumbai Rain Update |
रेल्वे, वाहतुकीसेवेवरही परिणाम
गेल्या तीन दिवसांपासून कोसळत असलेला पाऊस आजही सकाळी कायम असून त्यामुळे मुंबईतील अनेक भागांत पाणी साचलं आहे. पावसाचा परिणाम मुंबईकरांच्या लाईफलाईनवर अर्थात रेल्वे सेवेवरही झाला असून अनेक ठिकाणी रेल्वे सेवा संथ गतीने सुरू आहे. तसेच रस्त्यावर देखील पाणी साचल्याने व वाहतुकीसेवेवरही याचा परिणाम झाला आहे. Mumbai Rain Update |
हेही वाचा :





