ट्रक-बोलेरोचा भीषण अपघात; एकाच गावातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू

Kolhapur Accident | राधानगरी तालुक्यातील सरवडे येथे बोलेरो आणि ट्रकची जोरदार धडक झाल्याची घटना घडली आहे. यात एकाच गावातील तीन तरुण जागीच ठार झाले आहे. तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर ऐन गणेशोत्सवात सोळंकूर गावावर शोककळा पसरली आहे.
शुभम चंद्रकांत धावरे, आकाश आनंदा परीट, रोहन संभाजी लोहार अशी मृत तरुणांची नावे आहेत. तर ऋत्विक राजेंद्र पाटील, सौरभ सुरेश तेली, भरत धनाजी पाटील, संभाजी हणमंत लोहार हे जखमी झाले आहेत.
निपाणी देवगड राज्य महामार्गावर सरवडे-मांगेवाडी येथे 11 सप्टेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास सरवडे येथील नदीच्या पुलाजवळ एका बुलेरो गाडीला ट्रकने धडक दिली. या अपघातानंतर अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात ट्रक ड्रायव्हरनं भरधाव गाडी चालवत अपघात केला.
अपघातानंतर अपघातग्रस्तांना कोणतीही मदत न करता त्यानं घटनास्थळावरुन पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच राधानगरी पोलिसांनी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. तसेच ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. Kolhapur Accident |





