पश्चिम बंगालमध्ये उष्णतेची लाट; राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय
Updated On:

कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था पुढील आठवड्यात बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शाळेतून परत आल्यानंतर विद्यार्थ्यांना डोकेदुखी आणि आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत.
यामुळे उष्णतेची तीव्र लाट लक्षात घेता शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे पुढील आठवड्यात सोमवार ते शनिवारपर्यंत बंद राहतील.दरम्यान, प. बंगालमध्ये बहुतांश ठिकाणी दिवसाचे तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले जात असून, 19 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.





