Shivsena vs Shinde : तारीख पे तारीख, शिवसेनेच्या याचिकेवर 12 ऑगस्टला सुनावणी
Updated On:

नवी दिल्ली – शिवसेनेवर अधिकार कुणाचा? आणि 16 आमदारांच्या निलंबनाच्या मुद्यावर आज सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या मुद्यावर आता 12 आगस्ट रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.
“खरी शिवसेना आमचीच’ असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि शिवसेनेचे बंडखोर नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ही याचिका घटनापीठाकडे पाठवायची की नाही? ही बाब सर्वोच्च न्यायालयाकडून आज स्पष्ट होणार होती. परंतु, या याचिकेवरची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून 12 तारखेला सुनावणी होणार आहे.
शिवसेनेने केलेली निलंबनाची कारवाई या मुद्यावर उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट आमने-सामने असून दोन्ही पक्षांच्या वकिलांनी मागच्या सुनावणीत तर्कवितर्क मांडले होते.





