Ram Mandir : राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी ‘या’ दिवशी होणार सुनावणी
श्री राम मंदिरातील देणगीच्या रकमेत नेमका किती आणि कसा गैरव्यवहार झाला, याचा शास्त्रीय आणि कायदेशीर पुरावा गोळा करण्यासाठी एसआयटीने विशेष रणनीती आखली आहे.

Ram Mandir – अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणी न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर १७ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी निश्िचत करण्यात आली आहे.
ही सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्या. जॉयमाल्य बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर सुरू आहे. तत्पूर्वी, या याचिकांवरील सुनावणी पुढे ढकलण्याच्या उत्तर प्रदेश सरकारच्या वकिलाची विनंती मान्य केली.
दरम्यान, २७ जुलै रोजी या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी आयजीपी किरण एस. यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यांचे एसआयटी स्थापन केल्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली होती.
तसेच चौकशी पथकात फॉरेन्सिक ऑडिटरचाही समावेश करावा, असे निर्देश न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला दिले होते.
आर्थिक गैरव्यवहाराचा शोध घेण्यासाठी फॉरेन्सिक ऑडिट तज्ज्ञ
श्री राम मंदिरातील देणगीच्या रकमेत नेमका किती आणि कसा गैरव्यवहार झाला, याचा शास्त्रीय आणि कायदेशीर पुरावा गोळा करण्यासाठी एसआयटीने विशेष रणनीती आखली आहे.
या तपासात आता चार्टर्ड अकाउंटंट्स (CA) म्हणजेच फॉरेन्सिक ऑडिट तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. मंदिराच्या सर्व आर्थिक नोंदी, जमा-खर्च आणि बँकेचे व्यवहार यांचे फॉरेन्सिक ऑडिट केले जाणार आहे. यामुळे नेमका देणगी चोरी कशी झाली याची सखोल माहिती समोर येणार आहे.





