…म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान मोदींच्या फोटोला घातला हार

सतना (मध्य प्रदेश) – मध्ये प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला हार घातल्याचा फोटो समोर आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडली आहे. सतना नगरच्या शासकीय विद्यालयात हा संपूर्ण प्रकार घडला. येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण सुरु करण्यासाठीच्या अभियानाची सुरुवात करताना हा प्रकार घडला आहे.
देशात कालपासून १८ वर्षांवरील व्यक्तींच्या मोफत लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील सतना येथील नगरच्या शासकीय विद्यालयात लसीकरणासाठी महाअभियान सुरु करण्यात येणार होते. या महाअभियानाची सुरुवात करताना महात्मा गांधींच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर त्यांच्या शेजारीच असलेल्या मोदींच्या फोटोलादेखील हार घालण्यात आला. महाविद्यालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांकडून ही एक चूक झाली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला हार घातल्याचा फोटो व व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून येत आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उत्साहाच्या भरात भलतीच चूक केल्याने अजब प्रकार घडला आहे.
देशात सर्वाधिक लसीकरणात हे मध्य प्रदेशात झाले आहे. दिल्ली, उत्तर प्रदेशाला मागे टाकत मध्य प्रदेशने सर्वाधिक लसीकरण केले आहे.





