कोल्हापूर : राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज एक मोठी घोषणा केली. गर्भलिंग निदान सुरु असल्याची टीप देणाऱ्या खबरींना सरकारकडून १ लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. जी गर्भवती महिला यामध्ये कारवाईसाठी मदत करेल त्यांना देखील एक लाखाचं बक्षीस देण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी जाहीर केले.
पीसीपीएनडीटी चा कायदा अधिक प्रभावीपणे राबवणार
मुंबईत आरोग्य विभागाच्या वतीने मुंबईत बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत दोन निर्णय घेण्यात आले. ज्या एनजीओ असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील. त्यांना या प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी निर्णय घेण्यात आले. गर्भलिंग निदान सुरु असल्याची टीप देणारे खबरी त्यासाठी एक लाख बक्षीस देणार आहोत. या संदर्भात महिला आवाज उठवायला समोर येत असेल तर त्यांना सुद्धा एका लाखाचं बक्षीस देण्यात येईल. या सगळ्या मागचा उद्देश असा आहे की, पीसीपीएनडीटी चा जो कायदा आहे, तो अधिक प्रभावीपणे राबवणे आवश्यक आहे.
प्रकाश आबिटकर यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
1) गर्भलिंग निदानबाबत जे खबरे असतील त्यांना एक लाख रुपयाचे बक्षीस दिले जाणार
2) जी गर्भवती महिला यामध्ये कारवाईसाठी मदत करेल त्यांना देखील एक लाखाचं सहकार्य सरकारकडून मिळेल
3) गर्भलिंग निदान विरोधी कायदा हा अधिक बळकट करण्याबाबत केंद्राच्या राज्यांना सूचना
4) आरोग्य विभागाच्या वतीने मुंबईमध्ये दोन दिवसांपूर्वी बैठक घेतली त्यामध्ये काही निर्णय घेतले
5) सामाजिक संस्थांना या कार्यामध्ये सामावून घेतलं जाणार आहे
6) देशात आणि राज्यात मुलींचे प्रमाण कमी होत आहे हे खूप चिंता चिंताजनक आहे
7) पीसीपीएनडीटी प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हास्तरावर समित्यांचे नियोजन करण्यात आलं