“जो जन्माला आला त्याला एक दिवस जायचे आहे”; भोलेबाबा यांचे धक्कादायक विधान

Hathras Stampede | उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला. फुलराई गावात बाबा हरिनारायण साकार उर्फ भोले बाबा यांच्या सत्संगादरम्यान ही घटना घडली. यात लहान मुलांसह महिलांचा देखील मृत्यू झाला. या प्रकरणी अद्यापही भोले बाबा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
या घटनेनंतर चर्चेत आलेल्या भोलेबाबा यांनी धक्कादायक विधान केले आहे. ‘नशिबात जे लिहिले आहे ते कोणीही टाळू शकत नाही आणि प्रत्येकाला एक दिवस जग सोडून जायचेच आहे,” असे वक्तव्य भोले बाबा यांनी केल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत भोले बाबा म्हणाले की, “2 जुलैच्या घटनेपासून मी डिप्रेशनमध्ये असून अत्यंत व्यथित आहेत, परंतु, जे घडणार आहे, ते कसं टाळता येईल. जो आला आहे त्याला एक दिवस जायचे आहे.” पुढे ते म्हणाले, “आमचे वकील डॉ. एपी सिंह आणि प्रत्यक्षदर्शींनी आम्हाला माध्यमातील बातम्याबाबत सांगितले. त्यात काही तरी षडयंत्र आहे हे खरे आहे. आम्हाला एसआयटी आणि न्यायिक आयोगावर विश्वास आहे आणि सत्य बाहेर येईल.”
संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न
“सध्या मी माझ्या जन्मगावी बहादूर नगर, कासगंज येथे आहे. सनातन आणि सत्याच्या आधारे चालणाऱ्या त्यांच्या संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहे. पण आमचा एसआयटी आणि न्यायिक आयोगावर पूर्ण विश्वास आहे आणि ‘मानव मंगल मिलन सद्भावना समागम’च्या सर्व अनुयायांनाही पूर्ण विश्वास आहे की ते सर्व प्रयत्न करून कट रचणाऱ्यांचा पर्दाफाश करतील”, असे बाबा म्हणाले. Hathras Stampede |
दरम्यान, या चेंगराचेंगरीप्रकरणी २ जुलैच्या सत्संगाचे मुख्य आयोजक देवप्रकाश मधुकर यांच्यासह ११ जणांना अटक करण्यात आली आहे. तरएसआयटीच्या अहवालात स्थानिक प्रशासनाच्या त्रुटींकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. या अहवालात चेंगराचेंगरीसाठी आयोजकांना जबाबदार धरण्यात आले असून त्यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही व्यवस्था केली नसल्याचा दावा केला आहे. एसडीएम यांनी कार्यक्रमस्थळाची पाहणी न करता सत्संगाला परवानगी दिली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती दिली नाही, असा आरोपही चौकशी अहवालात करण्यात आला आहे. Hathras Stampede |
हेही वाचा:
चीनमध्ये मोठी दुर्घटना, ‘शॉपिंग मॉलला भीषण आग’;16 जणांचा होरपळून ‘मृत्यू’





