“तो सातत्याने सांगत होता, तुला सगळं…”; फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव

Fatima Sana Shaikh Casting Couch | ‘दंगल’ फेम अभिनेत्री फातिमा सना शेखने दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील आलेला कास्टिंग काउचचा अनुभव शेअर केला आहे. यापूर्वी देखील अनेक अभिनेत्रींना देखील कास्टिंग काउचचा सामना करावा लागला आहे. यानंतर आता फातिमाने देखील तिचा अनुभव शेअर केला आहे.
एका मुलाखतीदरम्यान ती म्हणाली की, “मला एका कास्टिंग दिग्दर्शकाने सांगितलं की तुझं प्रोफाइल पाठव. तो कास्टिंग डायरेक्टर दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतला होता. त्याने मला विचारलं तुला ही भूमिका दिली तर त्यासाठी तू सगळं काही करु शकतेस ना? त्यावर मी त्याला म्हटलं हो मी या भूमिकेसाठी जे आवश्यक आहे ती मेहनत घेईन. नंतर मला तो सातत्याने सांगू लागला की तुला सगळं करावं लागेल, तू तयार आहेस ना? तेव्हा मला हे बघायचं होतं की तो आणखी किती खालच्या थराला जाऊन बोलू शकतो. शेवटी त्यालाच लाज वाटली,” असा अनुभव फातिमाने सांगितला.
यानंतर हैदराबादमध्ये देखील असाच अनुभव आल्याचे सांगितले. ती म्हणाली की, “मी एका चित्रपटाच्या निमित्ताने हैदराबादला गेले होते. त्यावेळी काही निर्मात्यांना भेटले. ते निर्माते फारच वाईट आणि विचित्र पद्धतीने बोलत होते. मला वाटतं सध्या सगळीकडेच हा प्रकार आला आहे. मला खरोखरच या गोष्टीसाठी वाईट वाटतं की लोक अशा प्रकारे महिलांकडे पाहतात.” Fatima Sana Shaikh Casting Couch |
अलीकडेच फातिमा ‘सॅम बहादुर’ या सिनेमात इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसली होती. यानंतर आता ती अनुराग कश्यपच्या ‘मेट्रो इन दिनो’ चित्रपटात दिसणार आहे. यात आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, अनुपम खेर, नीना गुप्ता, पंकज त्रिपाठी, कोंकोना सेन गुप्ता आणि अली फजल या भूमिकेत आहेत. हा चित्रपट 2007 मध्ये ‘मेट्रो’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. Fatima Sana Shaikh Casting Couch |
हेही वाचा:
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये चक्क वाघाच्या मूत्राची विक्री, ‘या’ आजारावर प्रभावी औषध असल्याचा दावा





