“त्यानेच मला प्रपोज केलं, पण फोनवर बोलताना आईने पकडलं अन्..”; हृताने सांगितला तो किस्सा

Actress Hrutha Durgule : अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अभिनेता ललित प्रभावळकर त्यांच्या आरपार या सिनेमामुळे चर्चेत आहेत. या सिनेमाच जोरदार प्रमोशन केलं जात आहे. येत्या १२ सप्टेंबर या दिवशी हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
या सिनेमातून हृता आणि ललित यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान दिलेल्या मुलाखतीत हृताने आठवीत असताना तिला प्रपोज करण्यात आलं होतं. याचा किस्सा शेअर केला आहे. पण फोनवर बोलत असताना आईने पकडलं असल्याचं तिने थिंक बँकला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
मी त्याच्यासोबत फोनवरून बोलायचे आणि हे आईला कळलं हे माझ्या लक्षात आलं नाही, म्हणून मी पकडले गेले असं हृता म्हणाली. त्यावेळी प्रेमाची व्याख्या माहित नव्हती पण पहिलं प्रेम तेच होतं, असही हृताने मनमोकळेपणाने सांगितलं. तो माझ्या शाळेतला नव्हता म्युच्युअल फ्रेंन्ड म्हणून आमची ओळख झाली होती, असंही हृता म्हणाली.
अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिने अनन्या नावाच्या सिनेमात साकारलेल्या भूमिकेचं विशेष कौतुक करण्यात आलं होतं. आता हृता तिच्या आगामी आरपार या लव्हस्टोरी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तिने अभिनेता ललित प्रभावळकर याच्यासोबत स्क्रिन शेअर केली आहे.
हेही वाचा : World suicide prevention day: “जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन : मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या”

