जयपूर: राजस्थानमधील सत्तासंघर्ष आणखीच तीव्र होताना दिसत आहे. आमदारांच्या घोडेबाजावर समोर आलेल्या केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांचा आवाज ओळखला गेला असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
जयपूरमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते अजय माकन म्हणाले, ‘एफआयआरमध्ये गजेंद्रसिंग शेखावत यांचे नाव आले आहे आणि ऑडिओटेपमध्ये त्यांचा आवाज ओळखला गेला आहे, त्यामुळे शेखावत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा किंवा त्यांना मंत्रिपदावरून काढून टाकावे, जेणेकरून ते तपासावर परिणाम करू शकणार नाहीत.
गजेंद्र शेखावत म्हणत आहेत तो आवाज माझा नाही तर दुसर्या एखाद्या गजेंद्रसिंगचा आहे. जर अशी स्थिती असेल तर त्यांनी त्यांच्या आवाजाचे नमुने दिले पाहिजे. आणि तपास पूर्ण होईपर्यंत मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
तसेच भाजप शासित राज्यांची पोलिस राजस्थान पोलिसांना भंवरलाल शर्मा आणि विश्वेंद्र सिंग यांचे व्हॉईस नमुने घेण्याची परवानगी का देत नाहीत? असा प्रश्न देखील, अजय माकन यांनी उपस्थित केला.