‘मारहाण करणारा बॉडीगार्ड माझा नाही; पण….आमदार थोरवेंनी केला मोठा खुलासा

नेरळ: शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या बॉडीगार्डने एका व्यक्तीला भर रस्त्यावर लोखंडी पाइपाने मारहाण केल्याचा व्हिडीओ काही वेळापूर्वी ठाकरे गटाकडून व्हायरल करण्यात आला होता. यावर आता शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी मोठा खुलासा करत हा दावा खोदून काढला आहे.
काय म्हणाले आमदार महेंद्र थोरवे?
‘नेरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घटना घडली आहे. त्या घटनेशी आमचा कोणताही संबंध नाही. तो माझा बॉडीगार्ड सुद्धा नाही. सोशल मीडिया आणि टीव्हीवर आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड असल्याचं सांगितलं जात आहे. पण तो माझा बॉडीगार्ड नाही. पण दोन्ही कार्यकर्ते हे आमचे आहे. ज्याला मारहाण झाली तो माझा नातेवाईक आहे, असा खुलासा आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे.
ठाकरे गटावर केले आरोप
हा व्हिडीओ शेअर करून ठाकरे गटाने मला बदनाम करण्याचं काम केलं आहे. ठाकरे गटाने हे षडयंत्र रचलं आहे, असा आरोपदेखील आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी केला आहे.
महाराष्ट्रात गुंडाराज! मिंधेंच्या आमदाराच्या, महेंद्र थोरवे ह्यांच्या 'शिवा' नावाच्या बॉडीगार्डने नेरळ येथे भर दिवसा, भर रस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केली. त्या व्यक्तीची बायका मुलं रडत होती, पण कोणी मदतीला यायची हिम्मत केली नाही…
कायद्याच्या चिंधड्या, लोकांचे हाल!ही फक्त… pic.twitter.com/n0QX7Pp92x
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) September 11, 2024
काय आहे व्हिडिओमध्ये?
उद्धव ठाकरे गटाच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांचा शिवा नावाचा बॉडीगार्ड एका व्यक्तीला भर रस्त्यावर मारहाण करत आहे. एका होंडा सिटी कारमध्ये ही व्यक्ती बसलेली आहे. त्याची बायका मुलं सुद्धा कारमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. महेंद्र थोरवे यांचा शिवा नावाचा हा बॉडीगार्ड एक लोखंडी पाइप घेऊन या व्यक्तीला बेदम मारहाण करत आहे. एकापाठोपाठ दोन वेळा त्याने पाइपाने या व्यक्तीला मारहाण केली आहे.





