‘मला बुटाने मारले…’; सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांंमध्ये जोरदार राडा

Karnataka Bhavan Case | कर्नाटकमधील मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यातील मतभेद समोर आले आहेत. याचदरम्यान, आता सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांचा कर्नाटक भवनमध्ये जोरदार वाद झाला आहे. यावरून आता हे मतभेद केवळ त्यांच्यापुरतेच मर्यादित नसून, त्यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांमध्येही तणावाची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी औपचारिक तक्रार देखील करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकारी सी मोहन कुमार आणि उपमुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकारी एच अंजनेय यांच्यात ही हाणामारी झाली. मोहन कुमार यांनी सर्वांसमोर अंजनेय यांना धमकी दिल्याचे आणि त्यांना मारण्याची धमकी दिल्याचे सांगण्यात येत आहे. ही संपूर्ण घटना कर्नाटक भवनात उपस्थित असलेल्या इतर सरकारी कर्मचाऱ्यांसमोर घडली. या दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये शिवीगाळ आणि धमक्या देण्यात आल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. Karnataka Bhavan Case |
जर माझ्यासोबत कोणताही दुर्घटना घडली तर…
याप्रकरणी एच. अंजनेय यांनी याप्रकरणी अतिरिक्त निवासी आयुक्त आणि कर्नाटकच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांना औपचारिक तक्रार दिली आहे. पत्रात अंजनेय यांनी लिहिले आहे की, “जर माझ्यासोबत कोणताही दुर्घटना घडली तर मोहन कुमार जबाबदार असतील. मोहन कुमार यांनी यापूर्वीही एका व्यक्तीला मारहाण केली आहे,’ असा त्यांनी आरोप केला. ‘मला बुटाने मारण्यात आले, यामुळे माझी प्रतिष्ठा आणि स्वाभिमान दुखावला आहे. त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल करावा आणि मला न्याय मिळावा’, अशी मागणीही त्यांनी केली. Karnataka Bhavan Case |
यानंतर कर्नाटक भवनातील काही महिला कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेतली आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्याच्या वर्तनाबद्दल चिंता व्यक्त केली. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त निवासी आयुक्तांना महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीची चौकशी करण्याचे आणि आवश्यक असल्यास औपचारिक चौकशी सुरू करण्याचे निर्देश दिले. या घटनेमुळे केवळ कर्नाटक भवनातील प्रशासकीय शिस्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले नाहीत, तर राज्य सरकारच्या उच्च स्तरावरील राजकीय मतभेद आता सार्वजनिक रूप धारण करत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. Karnataka Bhavan Case |
हेही वाचा :





