Money laundering case : अनिल देशमुखांच्या माजी सचिवांनाही मिळाला जामीन

मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचे माजी खाजगी सचिव संजीव पलांडे (Sanjeev Palande) यांना सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्या एकल खंडपीठाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पलांडे यांच्या जामीन अर्जाला मंजुरी दिली.
27 जानेवारीला ते तरूंगातून बाहेर येतील असे त्यांचे वकील शेखर जगताप यांनी सांगितले. याच प्रकरणात त्यांच्या विरोधात ईडीनेही गुन्हा दाखल केला आहे पण त्यांना या प्रकरणात गेल्याच महिन्यात जामीन मंजूर झाला आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/bommai-should-pack-up-now-congress/
जून 2021 मध्ये त्यांना अटक करण्यात आली होंती. अनिल देशमुख यांनी आपल्याला मुंबईतील हॉटेलचालकांकडून दरमहा शंभर कोटी रूपये गोळा करून देण्याची सूचना केली होती असा आरोप मुंबई पोलिस दलातील बडतर्फ अधिकारी सचिन वाझे यांनी केल्यानंतर अनिल देशमुख यांच्याबरोबरच त्यांचे खासगी सचिव संजीव पलांडे यांनाही अटक करण्यात आली होती.





