मुंबई – मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता ‘अतुल कुलकर्णी’ याचा आज (10 सप्टेंबर) वाढदिवस. हिंदी, मराठीसह तेलगू, कन्नड, मल्याळम, तामिळ अशा विविध भाषांमध्ये एकापेक्षा एक सरस चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अतुल एक उत्तम अभिनेता आहे.
आज मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मराठमोळ प्रसिद्ध नाव म्हणजे ‘अतुल कुलकर्णी’ आहे. 10 सप्टेंबर1965 रोजी बेळगावमध्ये जन्मलेल्या अतुल यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण सोलापूर येथील हरिभाई देवकरण हायस्कूलमध्ये पूर्ण केलं.
त्यानंतर अभिनयाची आवड असल्यामुळे 1992 मध्ये अतुलने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी दिल्ली मध्ये प्रवेश घेतला. तिथे अतुल त्याने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ड्रॅमाटीक आर्ट्स ही पदवी मिळवली.
नटरंग’, ‘वळू’, ‘चांदनी बार’, ‘हे राम’ सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाने अतुल कुलकर्णी याने राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. एवढेच नव्हे तर बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाचे लेखन सुद्धा अतुलने केले आहे.