हझारा नेते माझरींचा पुतळा उद्ध्वस्त; तालिबानच्या कृत्याने बुध्दांच्या पुतळ्याच्या आठवणी जाग्या

काबूल – हझारा नेते अब्दूल अली माझरी यांच्या बामियानमधील पुतळा तालिबानने उद्ध्वस्त केला. त्यांनी गेल्या राजवटीत गौतम बुध्दाची जगातील सर्वात मोठी मुर्ती उद्ध्वस्त केली होती, त्याच्या आठवणी या घटनेमुळे जाग्या झाल्या आहेत.
आता तालिबानने पै. अब्दुल अली माझरी यांचा पुतळा उद्ध्वस्त केला आहे. गेल्या वेळेस त्यांनी बध्दांच्या जगतविख्यात पुतळ्याची नासधुस केली होती. किती महान उदारता आहे, असे ट्विट मानवी हक्क कार्यकर्ते सलीम जावेद यांनी केले आहे.
माअरी हे हझारा समाजावे नेते असून त्यांना तालिबानने 1995 मध्ये फासावर लटकवले होते. तालिबान वर्षानुवर्ष हझारा समाजावर हल्ले करत आहे. हा समाज हा एक वांशिक गट असून त्यांचे मुख्य वास्तव्य अफगाणीस्तानानच्या मध्यवर्ती भागातील पर्वतीय क्षेत्रात आहे. त्यांना हझारजात असे संबोधले जाते. हा समाज मोगल साम्राज्याचा संस्थापक गेंघीज खान आणि त्यांच्या सैन्याचे वंशज समजले जातात.
अफगाणस्तिान कार्यरत असणाऱ्या मोजक्या महिला जिल्हाधिकाऱ्यांपैकी एक असणाऱ्या सलिमा मझारी यांनाही तालिबानने ताब्यात ठेवले आहे. त्याही हझारा समाजातील आहेत. चहरकिंत जिल्ह्यात त्या कार्यरत होत्या.
शरीयत कायद्या प्रमाणे देश चालवण्यासाठी महिलांसह सर्वांनी कामावर रुजू व्हावे त्यांना कोणतीही इजा करण्यात येणार नाही असे आवाहन यापुर्वी तालिबानने केले होते.
9/11 ला अमेरिकेवर झालेल्या हल्ल्यानंतर तालिबानची सत्ता अमेरिकेने उलथावून टाकल्यानंतर सार्वजनिक फाशी, दगडांनी ठेचून मारणे, आणि अनन्वित छळाच्या घटना जुन्या पिढीतील नेते अद्याप विसरले नाहीत. अत्यंत कठोर इस्लामिक कायदे राबवणाऱ्या तालिबानमध्ये अलीकडे बरीच सुधारणा झाल्याचा दावा केला जात असला तरी त्याबाबबत साशंकता व्यक्त होत आहे.





