Actress Pass Away : मनोरंजन विश्वातील तेजस्वी तारा हरपला; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन
लोकप्रिय साय-फाय मालिका 'हीरोज' फेम प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री हेडन पॅनेटीअर हिचे वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी अचानक निधन (Actress Pass Away) झाले आहे.

Actress Pass Away : मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि चटका लावणारी बातमी समोर आली आहे. लोकप्रिय साय-फाय मालिका ‘हीरोज’ फेम प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री हेडन पॅनेटीअर हिचे वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी अचानक निधन (Actress Pass Away) झाले आहे.
इतक्या लहान वयात तिच्या अचानक जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीत मोठी खळबळ उडाली असून चाहत्यांना प्रचंड धक्का बसला आहे. तिच्या निधनाची बातमी अभिनेत्रीच्या अधिकृत प्रतिनिधीने दिली असून, तिच्या जाण्याने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
एका तेजस्वी आणि अफाट ऊर्जा असलेल्या अभिनेत्रीच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत असली, तरी तिच्या मृत्यूचे नेमके कारण काय? हा प्रश्न सध्या अनुत्तरितच आहे. एका वृत्तानुसार, हेडन गेल्या वर्षभरापासून पाठीच्या तीव्र दुखण्याने त्रस्त होती, मात्र मृत्यूमागचे (Actress Pass Away) नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
एक बालकलाकार म्हणून स्वतःचा प्रवास सुरू करणाऱ्या हेडनने २००६ ते २०१० दरम्यान ‘हीरोज’ या साय-फाय मालिकेत ‘क्लेअर बेनेट’ ही अविस्मरणीय भूमिका साकारून जगभरात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर ‘नॅशविल’ मालिकेतील ‘ज्युलिएट बार्न्स’ ही कंट्री सिंगरची भूमिका असो, किंवा ‘रिमेंबर द टायटन्स’, ‘रेजिंग हेलेन’, ‘आइस प्रिन्सेस’ आणि ‘स्क्रीम ४’ सारखे गाजलेले चित्रपट असोत प्रत्येक कलाकृतीत तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
याशिवाय ‘किंगडम हार्ट्स’ आणि ‘अंटिल डॉन’ या प्रसिद्ध व्हिडिओ गेम्समधील पात्रांना आवाज देण्यासोबतच तिने नुकतेच ‘दिस इज मी: अ रेकनिंग’ हे तिचे आत्मचरित्रही प्रकाशित केले होते. कारकिर्दीच्या अशा टप्प्यावर असताना तिचे अचानक निघून जाणे (Actress Pass Away) सर्वांनाच सुन्न करून गेले असून, सोशल मीडियावर जगभरातील चाहते आणि कलाकार तिला श्रद्धांजली वाहत आहेत.






