Deja Vu : आपण या आधी कधी भेटलो आहोत का? ‘देजा वू’ भूतकाळातील अनुभव पुन्हा जगण्याची भावना!

Deja Vu : आपण या आधी कधी भेटलो आहोत का? मी या ठिकाणी कधीतरी आलोय का? हे प्रश्न तुम्हाला या आधी कधी पडले आहेत का? तुम्ही एखाद्या नवीन शहरात गेलेले असता आणि तेथील एखादी वास्तू, चौक किंवा रस्ता तुम्हाला आपलासा वाटतो? किंवा एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदाच भेटलो तरी त्याची या आधी कधीतरी भेट झाली आहे, असा विचार मनात घोळत राहतो?
हे सर्व अनुभव तुम्हाला एकदा तरी आले असतील तर तुम्हीदेखील इतरांप्रमाणे ‘देजा वू’चा अनुभव घेतलेला असावा. ‘देजा वू’ या संकल्पनेला वैज्ञान किंवा तर्काचा काही आधार आहे का? असे अनुभव अनेकांना का येतात? यासंबंधी घेतलेला हा आढावा.
आपण या आधी कधी भेटलो आहोत का? मी या ठिकाणी कधीतरी आलोय का? हे दृश्य मी या आधी सुद्धा पाहिले आहे? आपल्या पैकी अनेकांनी हा अनुभव घेतलेला असेलच की, जे काही या क्षणी घडत आहे ते या पूर्वीही घडून गेलं आहे. अगदी असंच्या असं, सेम टू सेम… हे बऱ्याचदा काही लोकांच्या बाबत, काही जागा, ठीकाणांच्या बाबत आपल्याला वाटतं. जर शेवटच्या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असेल तर हे ‘देजा वू’ आहे.
अगदी सोप्या आणि फिल्मी भाषेत सांगाच झाल्यास तर ‘करण-अर्जुन’ सिनेमा, होय.. या चित्रपटात देखील अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान यांना देखील असे विचित्र भास, पूर्वी होऊन गेलेलं दृश्य किंवा आपण या जागी कधीतरी आलोय का? असं सतत दिसून येत. पण तो सिनेमा असला तरी याच गोष्टीचा एक भाग आहे. पण असं का होतं हे तुम्हाला माहितीये का? चला तर मग या मागची रंजक आणि वैज्ञानिक गोष्ट जाणून घेऊयात..
आपल्या सोबत घडणाऱ्या अश्या गोष्टींना ‘देजा वू’ असं म्हणतात. पण या ‘देजा वू’ संकल्पनेला वैज्ञान किंवा तर्काचा काही आधार आहे का? हे पाहणे खूप महत्वाचे आहे. देजा वू या संकल्पनेची सुरुवात मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, आणि न्यूरोलॉजी या क्षेत्रांमध्ये अभ्यासाअंती झाली. या अनुभवाला नाव देणे आणि त्यावरील विचारमंथन 19व्या शतकात सुरू झाले असल्याचं सांगण्यात येते.
‘देजा वू’ हा फ्रेंच भाषिक शब्द आहे. याचा अर्थ आहे ‘आधीच बघितलेलं’. ही अशी स्थिती आहे जेव्हा आपल्याला वाटतं हा प्रसंग, हा अनुभव आपल्यासोबत आधीच घडलेला आहे. या शब्दाचा पहिल्यांदा वापर 1876 मध्ये झाला. फ्रांसच्या एका फिलॉसॉफरने याचा उल्लेख एका पत्रात केला होता. 19व्या शतकात मानसशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ यांनी असे अनुभव समजून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ‘देजा वू’ला स्मृतीची गोंधळलेली प्रक्रिया किंवा मानसिक भास देखील मानले गेले.
‘देजा वू’ अनुभवाची वैशिष्ट्ये :
परिस्थितीची परिचितता : व्यक्तीला एखाद्या ठिकाणी, परिस्थितीत
किंवा प्रसंगात पूर्वी असण्याचा भास होतो.
निश्चित आठवण नसणे : जरी भास होतो, तरी व्यक्तीला या अनुभवाची
ठोस आठवण नसते. थोडीच घटना लक्ष्यात येते.
क्षणिक अनुभव : हा अनुभव काही सेकंद ते मिनिटभर टिकतो असतो.
‘देजा वू’ का होते? काही शास्त्रीय कारणे आणि सिद्धांत आहेत :
मेंदूतील असंतुलन : मेंदूतील स्मृती प्रक्रिया वेगळी रीतीने कार्य करत असते, ज्यामुळे नवीन अनुभव पूर्वीचा वाटतो.
स्मृतीतील त्रुटी : मेंदू काहीवेळा नवीन अनुभव चुकीच्या स्मृतीशी जोडतो.
स्नायूंचा प्रतिसाद आणि विलंब : मेंदूच्या एका भागाला एखाद्या प्रसंगाची प्रक्रिया करण्यासाठी थोडा उशीर होतो, ज्यामुळे डुप्लिकेट अनुभवाचा भास होतो.
झोपेचे कमी प्रमाण : झोपेच्या कमतरतेमुळे किंवा मानसिक ताणामुळे मेंदूची कार्यप्रणाली काही वेळेस विस्कळीत होते, ज्यामुळे ‘देजा वू’चा अनुभव होतो.
– देजा वू साधारणपणे कोणाला होतो? पाहा…
– तरुण व्यक्तींना अधिक जाणवतो.
– मानसिक थकवा किंवा ताण आल्यावर.
– कमी झोप घेणाऱ्या व्यक्तीला.
– काही मेंदूविकार असलेल्या व्यक्तींमध्ये अधिक प्रमाणात आढळतो.
– जास्ती प्रमाणात थकवा आल्याने देखील असे जाणवते.
– मानसिक आजाराशी झुंज देणारे व्यक्ती.
‘देजा वू’ची सुरुवात कशी होते?
‘देजा वू’ हा अनुभव अगदी अचानक आणि अनपेक्षितपणे सुरू होतो. हा अनुभव काही सेकंदांचा किंवा मिनिटाचा असतो. जसे की, तुम्ही एखाद्या विशिष्ट ठिकाणी, काही गोष्टी करत असताना किंवा कोणाशी बोलताना अचानक आपल्याला जाणवतं की, “हे सगळं अगोदरच घडलेलं आहे.? हे मी या आधी पहिलं आहे? हा अनुभव ‘देजा वू’ म्हणून ओळखला जातो.
आजच्या काळात देजा वूचे अनेक वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्पष्टीकरण दिले जाते. प्रत्येक जण आपल्या अनुभवाच्या किंवा अभ्यासाच्या जोरावर अनेक नवीन गोष्टी सांगत असतो. मात्र, या सर्व घटनेकडे एका दृष्टीने पहिले तर हा मानसिक थकवा किंवा मेंदूतील स्मृती प्रक्रियेचे विलंब आणि गोंधळ या यामुळे होणार भास किंवा अनुभव आहे. आज देखील अनेक डॉक्टर, शिक्षक आणि वैज्ञानिक याचे नवीन धागे-दोरे सापडताना दिसून येतात. आणि त्यांचे अनुभव जगासमोर मांडत असतात.





