थोडी तरी लाज बाळगा! धाराशिवमध्ये पुराचा हाहाकार, शेतकरी संकटात अन् जिल्हाधिकारी नाचण्यात दंग

Dharashiv Collector Dance | मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसाचा मोठा फटका बीड धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये बसला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरे, जनावरे सर्व वाहून गेले आहे. एकीकडे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला असताना जिल्हाधिकाऱ्यांनी बेजबाबदार वर्तन केल्याचे समोर आले आहे. धाराशिव जिल्ह्यात पुराचा हाहाकार सुरू असताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव या नाचगाण्यात दंग असल्याचं दिसून आले आहे.
तुळजापुरात नवरात्र महोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमातील डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तुळजापुरात मंदिर संस्थानकडून यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये त्यांचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. धारशिव जिल्ह्याला पुराचा फटका बसल्यानंतर अनेक मंत्री, अधिकारऱ्यांचे दौरे सुरू आहेत. मात्र बळीराजा हवालदिल झालेले असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या कृतीमुळे त्यांच्यावर टिकेची झोड उठली आहे.
View this post on Instagram
पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार
एकीकडे धाराशिवमध्ये शेत शिवारात पाणी आहे. संसार उघड्यावर पडले आहेत. पिक पुराच्या पाण्याखाली गेली आहेत, हे दृश्य डोळ्यात पाणी आणणार आहे. तर दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असल्याची टीका होत आहे. Dharashiv Collector Dance |
दरम्यान, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बीड, धाराशीव, परभणी यासारख्या जिल्ह्यांमध्ये लोकांच्या घरात पाणी घुसले आहे. हाताशी आलेले पीक वाहून गेले आहे. काही शेतातील पीक थेट पाण्याखाली गेले आहे. मराठवाड्यात साधारण 150 जनावरं दगावली. तर एकूण 8 जणांचा मृत्यू झाला. यंदाच्या खरीप हंगामात जवळपास 1200 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यात लाखो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले आहे. Dharashiv Collector Dance |
हेही वाचा:
ट्रम्पच्या नव्या टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला ; सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीही गडगडले





