मनीषा रानीला आवडतोय टोनी कक्कड़सोबत बनवलेल्या हैशटैग

मुंबई – बिग बॉस OTT 2 चा प्रवास संपल्यानंतर मनीषा राणी ही नेहा कक्करचा भाऊ टोनी कक्करसोबत अनेकदा स्पॉट झाली. यानंतर मनीषाचे चाहते सोशल मीडियावर ‘तोनिषा’ हा हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. त्या दोघांच्या डेटिंगची ही चर्चा सोशलवर चांगलीच रंगली आहे. अशात मनीषाने तिच्या आणि टोनी कक्करच्या मैत्रीबद्दल, तसेच एल्विश, अभिषेक यांच्यामध्ये तिला कोणता हॅशटॅग सर्वात जास्त आवडला याबद्दल खुलासा केला.
मनीषा म्हणाली,’मला तिन्ही हॅशटॅग आवडतात. सध्या ‘तोनिषा’ आणि ‘अभिषा’ माझ्या हृदयाच्या जवळ आहेत. बिग बॉसच्या घरात अभिषेक माझा खूप चांगला मित्र होता आणि आमची मैत्री कायम राहीली. आमच्यातले बाँडिंग लोकांनी पाहिले, त्यांना ते आवडले आणि त्यामुळे आमच्या नावाने हॅशटॅग तयार झाला. ‘तोनिषा’बद्दल बोलायचे झाले तर, टोनी कक्करशी माझी मैत्री नुकतीच सुरू झाली आहे.
ती पुढे म्हणाली“टोनी कक्कर खूप चांगला छान माणूस आहे की इतक्या कमी कालावधीत आमची मैत्रीही घट्ट झाली आहे. तो एक स्थिर, शांत आणि सभ्य स्वभावाचा माणूस आहे. टोनी लोकांचा आदर करतो. जेव्हा माझे वडील आणि मी त्यांना भेटलो तेव्हा त्याने माझ्या वडिलांचा आशीर्वाद घेतला. टोनी कक्करचे हे बोलणे मला खूप आवडले. नेहा कक्कर दी देखील खूप चांगली आहे आणि दोघेही ‘डाउन टू अर्थ’ आहे.
मनीषा राणी आणि टोनी कक्कर एकत्र दिसल्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, मात्र मनीषाने या अफवांना पूर्णविराम दिला आहे. ते म्हणाले की दोघेही फक्त मित्र असून दोघेही लवकरच एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहेत.





