Hasan Mushrif | वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ लवकरच एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. काही महिन्यापूर्वी त्यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता मंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी नावेद मुश्रीफ यांची निवड झाल्यानंतर मुश्रीफांनी कोल्हापूर जिल्हा बँकेचं अध्यक्षपद सोडण्याचा विचार केला होता.मंत्रिपदामुळे इतर कामकाजाला न्याय देता येत नाही. तसंच एकाच घरात दोन पदं नकोत असं वक्तव्य त्यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात केलं. यााबाबत त्यांनी अनेक वेळा अशी इच्छा व्यक्त केली होती. सगळीच पदे घरात नको म्हणून…. यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा आपण दहा वर्षे अध्यक्ष आहे. राज्याच्या मंत्रीमंडळातही अनेक वर्षे कार्यरत आहे. त्यातच मुलगा नविद मुश्रीफ हे नुकतेच कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष झाले आहेत. सगळीच पदे घरात नको म्हणून आपण जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले. मुश्रीफ यांच्या राजीनाम्यानंतर बँकेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे राहिले तर ज्येष्ठ संचालक ए. वाय. पाटील, राजेश पाटील, भैय्या माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांची नावे चर्चेत आहेत. तर मित्र पक्षांमध्ये कॉग्रेस आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे यांची नावे पुढे येऊ शकतात. Hasan Mushrif | 13 वर्षे जिल्हा बँकेचे अध्यक्ष गेल्या 40 वर्षांपासून मंत्री मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक आहेत. ते 13 वर्षे जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. मात्र ते राजीनामा देणार असल्याच्या चर्चेने खळबळ उडाली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सभा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या सभेनंतर ते राजीनामा देणार की त्यापुर्वी देणार हे पाहावे लागणार आहे. Hasan Mushrif | Hasan Mushrif | हेही वाचा : ‘चला हवा येऊ द्या’नंतर निलेश साबळेची स्टार प्रवाहवरील शोमध्ये धमाकेदार एन्ट्री