Hasan Mushrif ED Raid : जयंत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, “काही लोकांकडून…”

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या (Hasan Mushrif ED Raid) निवासस्थानी छापा टाकण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे.
जंयत पाटील म्हणाले की, यापूर्वीदेखील मुश्रीफ यांच्या निवासस्थानी आयकर विभागाची धाड टाकण्यात आली होती. त्यावेळी काही निष्पन्न झाले नाही.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/big-news-ed-raids-hasan-mushrifs-house-raids-in-case-of-ya-scam-excitement-in-ncp/
आताही ईडीकडून धाड टाकण्यात आली. मात्र विरोधी पक्षातील जे लोक सातत्याने ठामपणे सरकारविरोधात उभे राहतात त्यांच्या विरोधात विविध केंद्रीय यंत्रणांचा वापर करून त्यांना बदनाम किंवा नामोहरम करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होतोय, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.





