#PKLSeason10 ( #HSvCHE Match 71) : हरियाणा स्टीलर्सची आगेकूच; तमिळ थलैवाजवर केली मात…

Pro Kabaddi League (New Delhi) : प्रो-कबड्डी लीगमध्ये रविवारी झालेल्या सामन्यात हरियाणा स्टीलर्सने तमिळ थलैवाजचा ३६-३१ असा पराभव केला व आकेचू कायम राखली. हरियाणाचा विनय विजयाचा शिल्पकार ठरला.
या सामन्यात दोन्ही संघांची तुल्यबळ लढत झाली. मात्र, हरियणाने रेड गुणांमध्ये बाजी मारत आपले वर्चस्व सिद्ध केले. विनयने सर्वाधिक १० गुणांची कमाई करताना अखेरच्या काही मिनिटांमध्ये संघाला महत्वपूर्ण आघाडी प्राप्त करुन दिली. त्याला चंद्रन रंजीतने ७ गुण मिळवत सुरेख साथ दिली.
धाकड़ परफॉर्मेंस के साथ हरियाणा स्टीलर्स ने गाड़ा लठ 💪💙
तमिल थलाइवाज़ को हराकर दर्ज की अपनी सातवीं जीत 🔥#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #HSvCHE #HaryanaSteelers #TamilThalaivas pic.twitter.com/jnYfTlZ4So
— ProKabaddi (@ProKabaddi) January 14, 2024
तमिळ संघानेही जोरदार प्रतीकार केला. अजिंक्य पवारने ६ गुण मिळवले मात्र, त्याला अन्य खेळाडूंची फारशी साथ लाभली नाही. अखेरच्या काही मिनिटांमध्ये निर्णायक क्षणी त्यांना यशस्वी पकडी करता आल्या नाहीत. तसेच त्यांना टॅकल गुणही वाचवता आले नाहीत. हरियणाने सर्वबादचे २ तर अतिरीक्त २ असे ४ गुण मोक्याच्या क्षणी पटकावले. त्यांनी १९ रेड गुण मिळवत तमिळ संघाचे आव्हान मोडून काढले.
हरियाणाच्या जयदीप कुलदीपने विनयला साथ देत पहिल्यापासूनच यशस्वी चढाया केल्या. तसेच या जोडीने यशस्वी पकडीही केल्या. त्यामुळे तमिळ संघाने पहिल्या सत्रातही पिछाडी पत्करली होती व त्यांन अखेरपर्यंत ती भरून काढता आली नाही. हरियाणाने स्टार खेळाडू शिवम पातारेला आज बेंचवर बसवले असूनही विजयाची नोंद केली. या उलट तमिळ संघाच्या खेळाडूंना टॅकलमध्ये सातत्याने अपयश आले.





