Haryana : गॅस सिलिंडर फक्त 500 रुपयांत; ‘हर घर हर गृहिणी योजना’ पोर्टल लॉन्च

Haryana News | हरियाणातील सरकारने विधानसभा निवडणूकांपूर्वी मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारी 12 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी ‘हर घर हर गृहिणी योजना’ पोर्टल लाँच केले. या योजनेच्या माध्यमातून 500 रुपयांना गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिले जाणार आहे.
मुख्यमंत्री नायब सिंग सैनी म्हणाले की, “आमच्या सरकारने लोकांना लाभ देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांच्या 100% उत्पादनाची एमआरपीवर खरेदी करणे असो किंवा कमी पावसामुळे शेतकऱ्यांना एकरी 2,000 रुपये देणे असो. आमचे सरकार शेतकऱ्यांना बळ देण्याचे काम करत आहे.
पुढे ते म्हणाले, “परंतु काँग्रेसने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. भाजपच्या डबल इंजिन सरकारचे उद्दिष्ट गरीब आणि अंत्योदय कुटुंबांचे जीवन सुलभ करणे आहे. या पोर्टल अंतर्गत सुमारे 50 लाख बीपीएल कुटुंबांना 500 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर दिले जाणार आहेत. सिलिंडरवर खर्च होणारी 500 रुपये अतिरिक्त रक्कम हरियाणा सरकार उचलणार आहे.” Haryana News |
#WATCH | Panchkula | Haryana CM Nayab Singh Saini says, “…Our government has taken this responsibility to provide benefit to the people. Be it buying 100% farmers’ produce at MRP or giving farmers Rs 2,000 per acre due to less rain, our govt is continuously working to… pic.twitter.com/zU47tAO3ve
— ANI (@ANI) August 12, 2024
यावेळी नायबसिंग सैनी यांनी भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्यावर निशाणा साधताना ते केवळ आपल्या मुलाच्या प्रचारासाठी काम करत असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसच्या काळात गरिबांवर एफआयआरही नोंदवला गेला नाही. हुड्डा 10 वर्षे 24 तास वीज देऊ असे सांगत राहिले, पण वेळ असतानाही त्यांनी ती दिली नाही. आमचे सरकार आल्यावर आम्ही जनतेला 24 तास वीज दिली, असेही त्यांनी सांगितले. Haryana News |
500 रुपयांचा सिलेंडर कोणाला मिळणार?
‘हर घर हर गृहिणी योजना’ पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलद्वारे अंत्योदय कुटुंबांना 500 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता https.//epds.haryanafood.gov.in या लिंकवर एकाच वेळी घरबसल्या नोंदणी करून ग्राहकांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. या पोर्टल अंतर्गत, हरियाणा राज्यातील सुमारे 50 लाख बीपीएल कुटुंबांना 500 रुपयांमध्ये सिलिंडर उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
हेही वाचा:
आजपासून निवासी डॉक्टरांचं कामबंद आंदोलन; कोलकातामधील घटनेचा निषेध





