हरियाणात आज नव्या सरकारची फ्लोर टेस्ट ; नायबसिंग सैनी बहुमत सिद्ध करू शकणार का?

Haryana Floor Test । हरियाणामध्ये मंगळवारी मनोहर लाल खट्टर यांच्या राजीनाम्यानंतर नायब सिंग सैनी यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. नायबसिंग सैनी यांच्याशिवाय भाजपच्या चार आमदारांनी आणि एका अपक्ष आमदाराने मंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपच्या कंवर पाल व्यतिरिक्त मूलचंद शर्मा, जय प्रकाश दलाल, बनवारी लाल आणि अपक्ष आमदार रणजित सिंह चौटाला यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. हे पाच जण मनोहर लाल खट्टर मंत्रिमंडळातही मंत्री होते. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी बुधवारी विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याची विनंती राज्यपालांना केली आहे.
तर माजी गृहमंत्री आणि अंबाला कॅन्टोन्मेंटचे सहा वेळा आमदार राहिलेले अनिल विज यांना नवीन मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. अनिल विज नाराज असून शपथविधी सोहळ्याला ते उपस्थित नव्हते, असे सांगण्यात येतंय. त्याठिकाणच्या पक्षाच्या बैठकीनंतर ते थेट अंबाला येथील निवासस्थानी रवाना झाले.
48 आमदारांचे समर्थन पत्र सादर Haryana Floor Test ।
शपथ घेतल्यानंतर, मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी प्रतिक्रिया देताना,”त्यांनी राज्यपालांना 48 आमदारांचे समर्थन पत्र सादर केले आहे. तसेच त्यांना बुधवारी म्हणजे आज विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याची विनंती केलीय. जेणेकरून सरकार सभागृहात आपले बहुमत सिद्ध करू शकेल.
विधानसभेचे अधिवेशन बोलवण्याची विनंती Haryana Floor Test ।
नवनिर्वाचित मुख्यमंत्री सैनी म्हणाले, “आम्ही राज्यपालांना आज विधानसभेचे अधिवेशन बोलवण्याची विनंती केली आहे, जेव्हा आम्ही सभागृहात आमचे बहुमत सिद्ध करू.” किती आमदार सरकारच्या समर्थनात आहेत, असे विचारले असता ते म्हणाले की आम्ही राज्यपालांना बोलावण्यास सांगितले आहे.
48 आमदार.आमदारांना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या काही आठवडे आधी भाजपने हरियाणात मुख्यमंत्री बदलले आहेत. मनोहर खट्टर यांचा मुख्यमंत्रिपदाचा दुसरा कार्यकाळ या महिन्यात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीने संपणार होता. पण, त्याआधीच भाजप हायकमांडने मुख्यमंत्री बदलले.





