हरियाणातील उलथापालथीनंतर भाजपची आगेकूच ; जेपी नड्डा यांनी बोलावली सरचिटणीसांची बैठक

Haryana Elections Results 2024 । हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी सध्या मतमोजणी सुरु आहे. सकाळपासून मतमोजणी सुरु आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस राज्यात सत्ता स्थापित करेल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र काही वेळातच काँग्रेसच्या आनंदावर विरजण पडले. कारण याठिकाणी भाजपने जोरदार मुसंडी मारली असल्याचे समोर आले आहे. या उलथापालथीनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे.
जेपी नड्डा यांनी बोलावली सर्व महासचिवांची बैठक Haryana Elections Results 2024 ।
हरियाणा आणि जम्मू काश्मीरचे निकाल आता हळूहळू समोर येत आहेत. दरम्यान, हरियाणात भाजपने मोठ्या अपसेटमध्ये बहुमताचा आकडा पार केला आहे. मात्र, आतापर्यंत केवळ पाच फेऱ्यांची मतमोजणी झाली आहे. दरम्यान, मोठी बातमी अशी आहे की, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजपच्या सर्व महासचिवांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत निवडणूक निकालावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हरियाणा भाजपची मुसंडी Haryana Elections Results 2024 ।
दरम्यान , आज सकाळपासून हरियाणामधील विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसने आगेकूच केली होती. त्याच जोरावर काँग्रेस राज्यात सत्ता स्थापन करणार असल्याचे दिसत होते. मात्र काँग्रेसचा आनंद हा जास्त काळ टिकला नाही. एका तासातच भाजपने सगळं गेम पालटून आपल्या बाजूने करून घेतला. कारण भाजपने जोरदार मुसंडी मारत काँग्रेसला पिछाडीवर टाकले.
सुरुवातीच्या तासाभरात 30 जागांचीही वेस न ओलांडलेल्या भाजपने अचानक मुसंडी मारत आता 50 जागांपर्यंत आघाडी घेतली आहे. तर सुरुवातीच्या टप्प्यात 60 जागांवर आघाडी घेतलेल्या काँग्रेसची 35 पर्यंत घसरण झाली आहे. हरियाणा विधानसभेत सत्तास्थापनेसाठी 45 ही मॅजिक फिगर आहे. सध्याची परिस्थिती पाहता भाजप या आकड्याच्या पुढे आहे. त्यामुळे ही परिस्थिती कायम राहिल्यास हरियाणात भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येऊ शकते.





