हरियाणा निवडणुकीसाठी शेतकरी संघटनांचा मोठा निर्णय ; म्हणाले,”बदला घेण्याची वेळ आलीय भाजपला…’

Haryana Assembly Election । संयुक्त किसान मोर्चा (अराजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पिपली याठिकाणी ‘किसान महापंचायत’ घेतली. त्यातआगामी हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्याचे आवाहन करण्यात आले.
पिकांच्या किमान आधारभूत किमतीच्या कायदेशीर हमीसह त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी दोन्ही शेतकरी संघटना ‘दिल्ली चलो’ मोर्चाचे नेतृत्व करत आहेत. सुरक्षा दलांनी त्यांचा मोर्चा रोखल्यानंतर १३ फेब्रुवारीपासून पंजाब आणि हरियाणामधील शंभू आणि खनौरी सीमेवर आंदोलक शेतकरी आंदोलन करत आहेत.
आता शेतकरी बदला घेतील – सर्वनसिंह पंढेर Haryana Assembly Election ।
पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी पिपली येथील ‘किसान महापंचायत’मध्ये सहभाग घेतला आणि आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ 3 ऑक्टोबर रोजी देशभरात ‘रेल रोको’ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी,”हरियाणातील भाजप सरकारने शेतकऱ्यांवर केलेल्या अत्याचाराचा बदला घेण्याची वेळ आली आहे. आता शेतकरी बदला घेणार” असे सांगितले.
‘भाजपच्या पराभवात महत्त्वाची भूमिका बजावणार’ Haryana Assembly Election ।
हरियाणातील भाजप सरकार शेतकऱ्यांवर बळाचा वापर करते असा आरोप यावेळी त्यांनी केला. तसेच “हरियाणातील भाजपच्या पराभवात आम्ही महत्त्वाची भूमिका बजावू आणि शेतकऱ्यांवर झालेल्या अत्याचाराचा हिशोब घेऊ.” असाही इशारा त्यांनी दिला. संयुक्त किसान मोर्चा (अराजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाने जारी केलेल्या निवेदनानुसार, “शेतकरी नेत्यांनी हरियाणातील जनतेला मतदान करण्यापूर्वी विचार करण्याचे आवाहन केले आहे की सध्याच्या सरकारने गेल्या 10 वर्षांत शेतकऱ्यांसाठी काय केले आहे.”
तसेच हरियाणातील भाजपचा पराभव हीच शुभकरन सिंग यांना खरी श्रद्धांजली असेल, जे 21 फेब्रुवारी रोजी पंजाब-हरियाणा सीमेवरील खनौरी सीमेवर चकमकीत शहीद झाले होते. किसान महापंचायतमध्ये जगजित सिंग डल्लेवाल, मनजीत सिंग राय, जसविंदर सिंग लोंगवाल, सुरजित सिंग फूल आणि अमरजित सिंग मोहरी यांच्यासह अनेक शेतकरी नेते उपस्थित होते.
हेही वाचा
‘हिमाचल सरकार कर्ज घेऊन सोनिया गांधींना पुरवठा करते’ ; कंगना राणावतचा गंभीर आरोप





