पुणे जिल्हा | हर्षवर्धन पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल!

इंदापूर, (प्रतिनिधी)- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवार म्हणून गुरुपुष्पामृतच्या मुहूर्तावर भव्य रॅली काढून गुरुवारी (दि. 24) अर्ज दाखल केला.
उमेदवारी अर्ज दाखल करणेपूर्वी भाग्यश्री निवासस्थानी हर्षवर्धन पाटील यांचे खासदार सुप्रिया सुळे, भाग्यश्री पाटील, अंकिता पाटील ठाकरे यांनी औक्षण केले. यावेळी पृथ्वीराज जाचक, मुरलीधर निंबाळकर, राहुल मखरे, तेजसिंह पाटील, अँड कृष्णाजी यादव, विलासराव वाघमोडे, भारतीताई शेवाळे, अशोक घोगरे, सागरबाबा मिसाळ, नितीन शिंदे, काका देवकर, प्रा. कृष्णाजी ताटे, अनिल पवार, संजय शिंदे, बाबासाहेब भोंग, तुषार खराडे यांनी मनोगत व्यक्त केले.
या सभेमध्ये इंदापूर शहरातील अनिल पवार यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह तसेच बावडा ग्रा. पं. सदस्य पांडुरंग कांबळे, सुनील साबळे, विनोदकुमार जाधव यांनी असंख्य सहकार्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला.
यावेळी निरा भिमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, अंकिता पाटील ठाकरे, महारुद्र पाटील, राजवर्धन पाटील, महिला तालुकाध्यक्षा छायाताई पडसळकर, कार्याध्यक्षा आश्मा मुलाणी, मयूरसिंह पाटील,
अमोल भिसे, सुखदेव घोलप, आशुतोष भोसले, उदयसिंह पाटील, हेमंत नरुटे, उमेश घोगरे, चांगदेव घोगरे, शहराध्यक्ष इनायत काझी, महिलाध्यक्षा रेश्मा शेख, बाळासाहेब पाटील, नंदकुमार सोनवणे, प्रदीप पाटील, मोहन दुधाळ, पांडुरंग शिंदे, शिवाजी हांगे, बापू कोकाटे आदींसह शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ), काँग्रेसचे व विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन कैलास कदम व राजेंद्र पवार यांनी तर आभार अँड. शरद जामदार यांनी मानले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षातून सहा जणांनी उमेदवारी मागितली होती. लोकशाहीमध्ये उमेदवारीची इच्छा व्यक्त करणे योग्यच आहे. मीही पक्षाकडे उमेदवार मागणीचा अर्ज केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचा सारासार विचार करून माझ्या उमेदवारीचा निर्णय घेतला.
माझे पक्षातील सहकार्यांना आवाहन आहे की, पवार साहेबांचा विचार सोडू नका, त्यांचे हात बळकट करण्याची गरज आहे. उमेदवारी मागणारे सर्वजण आम्ही एकमेकांच्या जवळचे सहकारी आहोत. त्यामुळे यातून निश्चित मार्ग निघेल. -हर्षवर्धन पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार




