भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज नागपूरमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि हर्षित राणा या दोन खेळाडूंनी वनडेत पदार्पण केले. आजच्या सामन्यात हार्षित राणाने 7 षटकं टाकली आणि 53 धावा देत 3 गडी बाद केले. यासह हार्षित राणाच्या नावावर एका अनोख्या हॅट्रिकची नोंद झाली. ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज हार्षित राणा क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळला आहे. या तिन्ही फॉर्मेटमध्ये त्याने पहिल्याच सामन्यात तीन किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत. अशी कामगिरी करणारा हार्षित राणा भारताच्या इतिहासातील पहिला गोलंदाज ठरला आहे. भारतीय संघ 1974 पासून वनडे सामने खेळत आहे. या 50 वर्षात हार्षित राणासारखी कामगिरी कोणीही करू शकलेला नाही. हार्षित राणाने कसोटीतील पहिल्या सामन्यात 4 विकेट घेतल्या. टी- 20 क्रिकेटमध्ये त्याला कन्कशन सब्सटीट्यूट म्हणून खेळण्याची संधी मिळाली. तेव्हा त्याने 3 विकेट घेतल्या. आता वनडेत पदार्पणाच्या सामन्यात त्याने 3 विकेट घेत आपली अनोखी हॅट्रिक पूर्ण केली. इंग्लडविरुद्धच्या आजच्या सामन्यात त्याने बेन डकेट, हॅरी ब्रूक आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांची विकेट घेतली.