Harmanpreet Kaur Record : हरमनप्रीत कौरचा ऐतिहासिक वर्ल्ड रेकॉर्ड! महिला अन् पुरुष क्रिकेटमध्ये जगात कोणालाही न जमलेला केला पराक्रम
Harmanpreet Kaur Record : पुरुष आणि महिला अशा दोन्ही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट इतिहासात कोणालाच न जमलेला पराक्रम हरमनप्रीत कौरने करुन दाखवला आहे.

Harmanpreet Kaur Creates History Captains 150 T20Is In India vs Pakistan : महिला टी-२० आशिया चषक २०२६ (Women’s Asia Cup 2026) स्पर्धेत ५ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात प्रतिष्ठेचा महामुकाबला रंगला आहे. या हायव्होल्टेज सामन्यात नाणेफेकीसाठी मैदानात पाऊल ठेवताच भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नावावर एका अभूतपूर्व जागतिक विक्रमाची नोंद झाली आहे. पुरुष आणि महिला अशा दोन्ही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट इतिहासात १५० सामन्यांत नेतृत्व करणारी ती जगातील पहिलीच कर्णधार ठरली आहे. क्रिकेट जगतात आजवर कोणत्याही दिग्गजाला हा पल्ला गाठता आलेला नाही.
टॉस हरली पण जिंकली मने; हरमनप्रीतने व्यक्त केल्या भावना!
या सामन्यात नाणेफेकीचा कौल मात्र पाकिस्तानच्या बाजूने लागला. पाकिस्तानची कर्णधार सना फातिमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. टॉस गमावल्यानंतर १५० व्या सामन्याच्या विक्रमावर बोलताना हरमनप्रीत म्हणाली, “हा नक्कीच एक मोठा आणि अभिमानास्पद टप्पा आहे. परंतु, मैदानात जाऊन खेळाचा मनमुराद आनंद घेणे हे माझ्यासाठी नेहमीच सर्वात महत्त्वाचे राहिले आहे.” तिने पुढे स्पष्ट केले की, पाकिस्तानला कमीत कमी धावसंख्येत रोखून लक्ष्याचा सहज पाठलाग करण्याचे भारताचे ध्येय असून भारतीय प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल केलेला नाही.
२०१२ पासून अविरत प्रवास; ८७ विजयांसह टीम इंडियाचा दबदबा –
🚨 𝗠𝗶𝗹𝗲𝘀𝘁𝗼𝗻𝗲 𝗠𝗼𝗺𝗲𝗻𝘁, 𝗠𝗼𝗻𝘂𝗺𝗲𝗻𝘁𝗮𝗹 𝗠𝗼𝗺𝗲𝗻𝘁 🚨
Harmanpreet Kaur becomes the first cricketer to captain a side in 1️⃣5️⃣0️⃣ T20Is. 👏 👏
Updates ▶️ https://t.co/1WHHWPMe2o#TeamIndia | #WomensAsiaCup | @ImHarmanpreet pic.twitter.com/WrdFlp7kcH
— BCCI Women (@BCCIWomen) September 5, 2026
हरमनप्रीत कौरने २०१२ मध्ये पहिल्यांदा भारतीय संघाच्या टी-२० कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. तेव्हापासून तिने आपल्या आक्रमक आणि कणखर नेतृत्वाच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेटला नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. तिच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या आधीच्या १४९ टी-२० सामन्यांपैकी भारताने तब्बल ८७ सामन्यांत दणदणीत विजय मिळवला आहे, तर ५७ सामन्यांत पराभव पत्करावा लागला आणि ५ सामने अनिर्णित राहिले आहेत.
जागतिक यादीत हरमनप्रीत अव्वल; दिग्गज कर्णधारांना टाकले मागे –
A special moment for #TeamIndia Captain Harmanpreet Kaur 🫡
First-ever to captain a side in 150 T20I matches 🙌#WomensAsiaCup | @ImHarmanpreet pic.twitter.com/a31diDfcoh
— BCCI Women (@BCCIWomen) September 5, 2026
महिला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यांत नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत हरमनप्रीत कौर आता १५० सामन्यांसह निर्विवादपणे पहिल्या स्थानी विराजमान झाली आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर श्रीलंकेची चामरी अटापट्टू (१२१ सामने) असून, ऑस्ट्रेलियाची माजी महान कर्णधार मेग लॅनिंग (१०० सामने) तिसऱ्या स्थानावर आहे. तर इंग्लंडची हीदर नाइट (९६ सामने) आणि रवांडाची डायने बिमेनीमाना (९६ सामने) यांच्या नावाचा समावेश आहे.





