“महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना नपुंसक बनवा” ; राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे धक्कादायक विधान

Haribhai Bhagde on Rapist। राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी देशातील महिला अत्याचाराच्या घटनांवर चिंता व्यक्त केली. तसेच त्यांनी इतरांना असे जघन्य गुन्हे करण्यापासून रोखण्यासाठी बलात्काऱ्यांना नपुंसक केले पाहिजे असे धक्कादायक वक्तव्य केले आहे. भरतपूर येथील जिल्हा बार असोसिएशनच्या शपथविधी समारंभात बोलताना बागडे यांनी हे विधान केले आहे.
बलात्काऱ्यांना नपुंसक बनवा Haribhai Bhagde on Rapist।
राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी या कार्यक्रमात बोलताना महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी उपाय योजिले पाहिजेत असे म्हटले. याविषयी बोलताना त्यांनी,”महाराष्ट्रात एकच नगर पंचायत आहे. तिथे खूप कुत्रे होते आणि त्यांची संख्या वाढत होती, म्हणून त्यांची संख्या कमी करण्यासाठी नसबंदी करण्यात आली.” असे म्हणत बलात्कार करणाऱ्यांवरही अशीच कडक कारवाई करायला हवी असे म्हटले. तसेच याविषयी बोलताना,”त्यांना नपुंसक करून सोडा. त्यांना असेच जगावे लागेल आणि जेव्हा इतर त्यांना पाहतील तेव्हा त्यांना आठवेल की तोच व्यक्ती (बलात्कारी) होता. बलात्कारींवर कठोर कारवाई करण्याची गरज अधोरेखित करताना, राज्यपालांनी इशारा दिला की “जर अशा गुन्हेगारांना लगाम घातला नाही तर ते समाजासाठी धोका निर्माण करत राहतील.”
लोकांना हे आवाहन Haribhai Bhagde on Rapist।
पीडितेला मदत करण्याऐवजी महिलांच्या छळासारख्या घटनांचे व्हिडिओ बनवणाऱ्यांवरही त्यांनी टीका केली. बागडे म्हणाले की, “जोपर्यंत आपण ही मानसिकता बदलत नाही तोपर्यंत लैंगिक गुन्हे थांबणार नाहीत”. त्यांनी लोकांना पुढे येऊन पीडितांना मदत करण्याचे आवाहन केले. सुलभ आणि जलद न्यायाच्या संकल्पनेवर लक्ष केंद्रित करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
सामान्य लोकांना वेळेवर आणि सुलभ न्याय देण्यासाठी वकिलांनी त्यांच्या कौशल्यांचा प्रभावीपणे वापर करावा असे आवाहन त्यांनी केले. गरजूंना मदत करण्यासाठी न्यायाच्या संकल्पनेतून शिकण्याचे आवाहन राज्यपालांनी सर्वांना केले. राज्यपाल म्हणाले की, छेडछाडीच्या घटनांचे व्हिडिओ बनवण्याऐवजी लोकांनी गुन्हेगारांना पकडून मारहाण करावी.





