Khel Ratna Award : भारतीय पुरुष हॉकी संघाच्या उपकर्णधार हार्दिक सिंगची यंदाच्या देशाच्या सर्वोच्च क्रीडा सन्मान ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न’ पुरस्कारासाठी एकमेव शिफारस करण्यात आली आहे. तर, युवा बुद्धीबळपटू दिव्या देशमुख, डेकॅथलॉनमधील अग्रणी तेजस्विन शंकर आणि रायफल शूटर मेहुली घोष यांच्यासह एकूण २४ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी निवड समितीने शिफारस केली आहे. हार्दिक सिंग हा भारतीय हॉकी संघाच्या मिडफील्डचा मुख्य आधारस्तंभ आहे. तो २०२१ टोकियो आणि २०२४ पॅरिस ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक जिंकलेल्या संघाचा भाग होता. यावर्षी त्याने आशिया चषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या संघाचेही नेतृत्व केले होते. हार्दिकची ही सातत्यपूर्ण कामगिरी लक्षात घेऊन निवड समितीने खेल रत्नसाठी त्याच्या नावाची शिफारस केली आहे. अर्जुन पुरस्काराच्या यादीत प्रथमच योगासन खेळाडूची निवड – अर्जुन पुरस्काराच्या यादीत प्रथमच योगासन खेळाडूची निवड झाली आहे. राष्ट्रीय आणि आशियाई विजेती आरती पाल हीला हा बहुमान मिळाला आहे. योगासनला क्रीडा मंत्रालयाने औपचारिक मान्यता मिळाल्यानंतर पाच वर्षांनी प्रथमच या खेळातील खेळाडूला अर्जुन पुरस्काराची शिफारस झाली आहे. आरती पाल ही २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रदर्शन खेळ म्हणून समावेश असलेल्या योगासनमध्ये राष्ट्रीय विजेती आहे.दिव्या देशमुख ही बुद्धीबळ विश्वचषक जिंकणारी पहिली महिला बुद्धीबळपटू आहे. हेही वाचा – Karnataka Team : कर्नाटकचा ऐतिहासिक पराक्रम! झारखंडचा धुव्वा उडवत मोडला १३ वर्षांपूर्वीचा विक्रम तिच्यासह विदित गुजराथी, ऐतिहासिक आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता तेजस्विन शंकर, जागतिक स्पर्धेतील दोन वेळा कांस्यपदक विजेती मेहुली घोष, जिम्नॅस्ट प्रणती नायक आणि महिला बॅडमिंटन जोडी ट्रीसा जॉली-गायत्री गोपीचंद यांचीही अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झाली आहे. यंदाच्या यादीत क्रिकेटपटूंचा समावेश नाही. २०२३ मध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांना हा पुरस्कार मिळाला होता. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार शिफारसी – मेजर ध्यानचंद खेल रत्न: हार्दिक सिंग (हॉकी) हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्माचा लिस्ट-ए क्रिकेटमध्ये मोठा धमाका! डेव्हिड वॉर्नरच्या ‘वर्ल्ड रेकॉर्ड’शी केली बरोबरी अर्जुन पुरस्कार: तेजस्विन शंकर (ॲथलेटिक्स), प्रियंका (ॲथलेटिक्स), नरेंदर (बॉक्सिंग), विदित गुजराथी (शतरंज), दिव्या देशमुख (शतरंज), धनुष श्रीकांत (डेफ शूटिंग), प्रणती नायक (जिम्नॅस्टिक्स), राजकुमार पाल (हॉकी), सुरजीत (कबड्डी), निर्मला भाटी (खो-खो), रुद्रांश खंडेलवाल (पॅरा-शूटिंग), एकता भयान (पॅरा-ॲथलेटिक्स), पद्मनाभ सिंग (पोलो), अरविंद सिंग (रोइंग), अखिल शेओरन (शूटिंग), मेहुली घोष (शूटिंग), सुतिर्था मुखर्जी (टेबल टेनिस), सोनम मलिक (कुस्ती), आरती (योगासन), ट्रीसा जॉली (बॅडमिंटन), गायत्री गोपीचंद (बॅडमिंटन), लालरेमसियामी (हॉकी), मोहम्मद अफसल (ॲथलेटिक्स), पूजा (कबड्डी).