Hardik Pandya Trade : अर्शदीप मुंबईत, हार्दिक पंजाबमध्ये! कोट्यवधींच्या खेळाडूंची थेट अदलाबदल; IPLच्या इतिहासातील सर्वात मोठी डील फायनल
Hardik Pandya Trade : हार्दिक पंड्या २०२४ च्या हंगामात मुंबई इंडियन्समध्ये परतला आणि त्याला लगेचच कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. मात्र, त्याचे पुनरागमन अयशस्वी ठरले आणि मुंबईला एकही विजेतेपद जिंकता आले नाही.

Hardik Pandya Traded To Punjab Kings Arshdeep Singh Joins Mumbai Indians : अनेक महिन्यांच्या जोरदार चर्चा, अंतर्गत वाद आणि नाट्यमय घडामोडींनंतर अखेर टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या आयपीएलमधील नव्या प्रवासावर शिक्कामोर्तब झाले आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार राहिलेला हार्दिक आता आगामी हंगामात पंजाब किंग्सच्या (PBKS) ताफ्यात दाखल होणार आहे. इतर अनेक संघांना मागे टाकत प्रीती झिंटाच्या पंजाब संघाने या शर्यतीत बाजी मारली आहे. मात्र, हार्दिकला आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी पंजाब किंग्सला आपला स्टार डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला मुंबई इंडियन्सकडे ट्रेड करावे लागले आहे.
बीसीसीआयकडे कागदपत्रे सुपूर्द; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणार
‘पीटीआय’च्या वृत्तानुसार, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या दोन्ही फ्रँचायझींनी या ऐतिहासिक ट्रेड डीलशी संबंधित आवश्यक कागदपत्रे बीसीसीआयच्या आयपीएल गवर्निंग कौन्सिलकडे मंजुरीसाठी पाठवली आहेत. दोन्ही खेळाडूंनी आणि व्यवस्थापनाने यावर सहमती दर्शवली असून लवकरच अधिकृत घोषणा होईल. विशेष म्हणजे, हार्दिक पंड्या पंजाबचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली केवळ एक खेळाडू म्हणून खेळण्यास आनंदाने तयार झाला आहे. त्यामुळे सलग पाच हंगाम कर्णधारपद भूषवल्यानंतर हार्दिक आता मैदानावर केवळ खेळाडू म्हणून उतरताना दिसेल.
मुंबईतील दुसरी इनिंग ठरली वादग्रस्त; चाहत्यांच्या रोषाला जावे लागले होते सामोरे
Mumbai Indians (MI) will have a new captain for IPL 2027 as Cricinfo has learned that the five-time IPL champions are set to trade Hardik Pandya to Punjab Kings (PBKS) in exchange for left-arm fast bowler Arshdeep Singh. https://t.co/mv0DgIqsDZ
— Cricinfo (@cricinfo) November 7, 2026
हार्दिकने २०१५ ते २०२१ पर्यंत मुंबईकडून खेळल्यानंतर २०२२ मध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व स्वीकारत पहिल्याच वर्षी त्यांना चॅम्पियन बनवले होते. मात्र, २०२४ च्या हंगामापूर्वी रोहित शर्माच्या जागी हार्दिककडे मुंबईचे कर्णधारपद सोपवण्यात आल्याने मोठा वाद पेटला होता. सलग तीन हंगाम मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये प्रचंड ताणतणाव राहिला, तर वानखेडे स्टेडियमवर खुद्द घरच्या चाहत्यांनीच हार्दिकविरुद्ध जोरदार हूटिंग केली होती. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला तीनपैकी दोन वेळा तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागले, ज्यामुळे अखेर त्याने संघ सोडण्याचा निर्णय घेतला.
अर्शदीप सिंगचा पंजाबमधील ८ वर्षांचा प्रवास संपुष्टात –
⌛️
Cricbuzz understands that the blockbuster trade between Mumbai Indians and Punjab Kings is on the verge of completion.
Hardik Pandya➡️PBKS
Arshdeep Singh➡️MIIt is learnt that both players have consented to the trade, which is expected to be formally confirmed by the BCCI. https://t.co/9OYBKB1EYJ
— Cricbuzz (@cricbuzz) November 7, 2026
दुसऱ्या बाजूला, भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचा पंजाब किंग्ससोबतचा प्रदीर्घ प्रवास या ट्रेडमुळे संपुष्टात आला आहे. २०१९ मध्ये पंजाबकडून पदार्पण करणाऱ्या अर्शदीपने याच संघाच्या जोरावर भारतीय संघात आपले स्थान पक्के केले होते. गेल्या मेगा लिलावात पंजाबने त्याला १८ कोटी रुपयांची मोठी बोली लावून पुन्हा संघात घेतले होते. पंजाबसाठी ८ हंगामांत ९६ सामने खेळत १११ विकेट्स घेणारा अर्शदीप आता आगामी मोसमात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीचे नेतृत्व करताना दिसेल.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी स्वॅप डील –
या ऐतिहासिक खेळाडू अदलाबदलीने आयपीएलच्या रणसंग्रामातील सर्व समीकरणे बदलून टाकली आहेत. मुंबई इंडियन्सला जसप्रीत बुमराहसोबत आता अर्शदीप सिंगसारखा जागतिक दर्जाचा भारतीय डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज मिळाला आहे, तर पंजाब किंग्सच्या संघात हार्दिकच्या रूपाने एक सर्वोत्तम फिनिशर आणि मॅचविनर अष्टपैलू खेळाडू दाखल झाला आहे. या मेगा ट्रेडमुळे आयपीएलच्या आगामी हंगामाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.





