पुणे : रिक्षाचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
Updated On:

पुणे – रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना राजाराम पूल येथे घडली. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षाचालकाचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 16 वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनयभंग आणि “पॉक्सो’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्लास सुटल्यावर पीडित साडेआठच्या सुमारास कोथरूडहून घरी निघाली होती. चालकाने रिक्षा राजाराम पुलाजवळ थांबवली आणि मुलीचा विनयभंग केला. पीडितेने पालकांना माहिती दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी सीसीटीव्ही नव्हते. मात्र, थोड्याच अंतरावर असलेल्या सीसीटीव्हीत मुलगी बॅग घेऊन जाताना दिसत आहेत. मुलीने रिक्षाचा आठवत असलेला नंबर सांगितला आहे. त्यानुसार तपास सुरू आहे. – पौर्णिमा गायकवाड, पोलीस उपायुक्त





