Happy Married Life ! हाऊसफुल 2 मधील प्रसिद्ध अभिनेत्री अकडली लग्नबंधनात; इन्स्टावर सुंदर फोटो केले शेअर

Actress Shazaan Padamsi : एकीकडे आज हाऊसफुल ५ हा चित्रपट रिलीज झाला असून दुसरीकडे हाऊसफुल २ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे. अभिनेत्री शाझान पदमसी हिने तिचा प्रियकर आशिष कनकियाशी लग्न केले आहे. तिने स्वतः तिच्या लग्नाचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटो पाहून सेलिब्रेटी आणि चाहते अभिनंदन करताना दिसत आहे.
तिच्या चाहत्यांनी शाझाना आणि तिचा पती आशिष या दोघांनाही त्यांच्या लग्नाच्या आणि वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हाऊसफुल २ या चित्रपटात अभिनेत्री शाझान पदमसी दिसली होती. बॅालीवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. अभिनेत्रीने एका खाजगी समारंभात तिचा बॅायफ्रेंड आशिष कनकियाशी लगीनगाठ बांधली आहे.
View this post on Instagram
शाझान पदमसी आयव्हरी लेहेंगा लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिने स्लीव्हलेस ब्लाउज आणि लेहेंग्यासह कमीत कमी मेकअप असे पहेराव परिधान केला होता. तर तिचा पती आशिष कनकिया देखील शेरवानीमध्ये छान दिसत होता. अभिनेत्री शाझान पदमसीने जानेवारी २०२५ मध्ये आशिष कनकियाशी साखरपुडा केला होता. अभिनेत्रीने फोटोंना ‘नवीन सुरुवात. २०.०१.२०२५’. असे कॅप्शन देखील दिले होते. आता तिने लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्री शाझान पदमसी ही एक प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने हिंदी आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय तिने ‘दिल तो बच्चा है जी’ ‘हाऊसफुल २’ ‘रॉकेट सिंग’, ‘साला’, ‘डिस्को व्हॅली’ ‘एक और बोल बच्चन’ अशा काही चित्रपटांमध्येही काम केले आहे.
हेही वाचा: दीपिका पादुकोणला आणखी एक मोठा झटका! ‘स्पिरिट’नंतर कल्की 2 मधूनही पत्ता कट होणार?





