#happy birthday the wall : ‘राहुल द्रविड’

मुंबई – टीम इंडियाचा ‘द वॉल’ म्हणून प्रसिद्ध असलेला माजी फलंदाज ‘राहुल द्रविड’ याचा आज वाढदिवस आहे. द्रविडचा जन्म ११ जानेवारी १९७३ रोजी इंदूर येथे झाला होता. परंतु त्याचे कुटुंब नंतर कर्नाटकात स्थायिक झाले. द्रविडने वयाच्या १२ व्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.
खेळपट्टीवर जास्तीत जास्त वेळ खेळण्याच्या त्याच्या कौशल्यामुळे राहुल द्रविडला ‘द वॉल’ अशी उपाधी देण्यात आली असून, त्याला अर्जूना, पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सुद्धा गौरवण्यात आलं आहे.
इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर द्रविडने माजी कर्णधार सौरव गांगुली याच्याबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. १९९६ मध्ये त्याने पदार्पण केल्यानंतर द्रविड संघाचे मुख्य सदस्य बनले.
View this post on Instagram
दरम्यान १६ वर्ष भारतीय क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व केल्यानंतर मार्च २०१२ मध्ये द्रविडने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली.





