अलीकडेच फोटोग्राफर डब्बू रतनानी याच्या कॅलेंडरच्या शूटिंगसाठी रेखा गेली होती. तिथेही रेखाचा लूक एकदम सॉलिड होता. पण या ठिकाणी अशी घटना घडली ज्यामुळे रेखा सध्या चर्चेत आली आहे.
\n\n\n\n\n\n\n
\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nView this post on Instagram\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n
A post shared by CineRiser (@cineriserofficial) on
\n
त्याचं झालं असं, डब्बूच्या स्टुडिओमधील एका भिंतीवर बॉलीवूड सेलीब्रेटींचे फोटो लावलेले आहेत. बरेचसे स्टार मीडियाला तिथेच पोझ देत असतात. रेखाही तिथे पोझ देऊन फोटोसेशन करत होती. तेवढ्यात तिची नजर या भिंतीवर असलेल्या एका फोटोवर पडली. हा फोटो होता महानायक अमिताभ बच्चन यांचा.
\n\n
\n\n\n\n\n
\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nView this post on Instagram\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n
\nतो फोटो पाहून रेखा हसत हसत म्हणाली, “हा डेंजर झोन आहे.’ त्यानंतर ती तिथून निघून दुसरीकडे गेली आणि “हां आता इथे ठीक आहे’ असं म्हणत फोटोसेशन सुरु केले. आता रेखाने हे सहजगत्या, चेष्टेने म्हटले की पूर्वीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर तिने मारलेला उपहासात्मक टोमणा होता हे तिचे तिलाच ठाऊक !