हंसिका मोटवानीने पतीसोबत केला गृहप्रवेश; दाखवली घराची झलक

Hansika Motwani New House | अभिनेत्री हंसिका मोटवानीने बॉलिवूडसह साऊथ इंडस्ट्रीतही मोठे यश मिळवले आहे. हृतिक रोशनच्या ‘कोई मिल गया’ या चित्रपटातील बालकलाकारच्या भूमिकेने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. हंसिकाने 4 डिसेंबर 2022 रोजी सोहेल कथुरियासोबत लग्न केले. अलीकडेच या जोडप्याने नवीन घर खरेदी केले आहे. हंसिकाने तिच्या नवीन घराच्या गृहपूजेच्या झलक शेअर केली आहे.
अभिनेत्रीने पती सोहेल खतुरियासोबत गृहप्रवेश करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. डोक्यावर कलश घेत रितीरिवाजानूसार तिने गृहप्रवेश केला. यावेळी हंसिकाने हिरव्या रंगाची सिल्क साडी परिधान केली होती. ज्यात ती फारच सुंदर दिसत होती. तर तिचा पती सोहेल कथुरिया फिकट हिरव्या रंगाच्या शेरवानीमध्ये दिसला.
View this post on Instagram
हंसिकाने “नवीन सुरूवात…” असं म्हणत इन्स्टाग्रामवर गृहप्रवेशाचे फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या या फोटोनंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. Hansika Motwani New House |
हंसिका मोटवानीने बाल कलाकार म्हणून टीव्ही इंडस्ट्रीत प्रवेश केला. 2000 मध्ये ती ‘शका लाका बूम बूम’मध्ये दिसली होती. यानंतर त्याने एकता कपूरच्या ‘सास भी कभी बहू थी’ या लोकप्रिय मालिकेत काम केले. हंसिका शेवटची 2024 मध्ये ‘गार्डियन’ या हॉरर चित्रपटात दिसली होती. Hansika Motwani New House |
हेही वाचा:
‘सुमार कामगिरी’ करणाऱ्या भाजपच्या पाच नेत्यांचा पत्ता कट? ; राम कदमांसह ‘या’ 5 आमदारांचा समावेश





