Hangzhou & Chengdu Open 2024 : प्रशांत-जीवन जोडीनं हांगझो तर युकीने फ्रान्स जोडीदारासह चेंगडू ओपनच्या उपांत्य फेरीत मारली धडक…

Hangzhou Open & Chengdu Open 2024 : भारताच्या विजय सुंदर प्रशांत आणि जीवन नेदुनचेझियान यांनी शनिवारी हांगझो ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत द्वितीय मानांकित ब्रीटीश जोडी ज्युलियन कॅश आणि लॉयड ग्लासपूलचा पराभव करत तर दुसरीकडे युकी भांबरीने त्याच्या फ्रेंच जोडीदारासह चेंगडू ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
Vijay Sundar Prashanth/Jeevan Nedunchezhiyan pair scored superb comeback win over Lloyd Glasspool/Julian Cash (🇬🇧) 6(4)-7,7-6(6),10-8 to reach semifinal at #HangzhouOpen24, which is #ATP 250 event. #Tennis pic.twitter.com/WXIoeBglu8
— Sport in a nutshell (@Shuvo10976159) September 21, 2024
हांगझोऊ येथे खेळल्या जात असलेल्या स्पर्धेत प्रशांत आणि नेदुनचेझियान यांनी सुरुवातीचा सेट गमावला, परंतु त्यानंतर त्यांनी जोरदार पुनरागमन केले आणि दोन तास चाललेल्या लढतीत 6-7 (4) 7-6 (6) 10-8 असा विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत स्थान मिळवले. भारतीय जोडीचा पुढील सामना एरियल बेहार(उरुग्वे) आणि रॉबर्ट गॅलोवे (अमेरिका) या तिसऱ्या मानांकित जोडीशी होणार आहे.
Chess Olympiad 2024 (9th Round) : महिला संघाने अमेरिकेशी व पुरुषांनी उझबेकिस्तानशी साधली बरोबरी…
दुसरीकडे, चेंगडूमध्ये भांबरी आणि फ्रान्सच्या अल्बानो ऑलिवेट्टी या तिसऱ्या मानांकित जोडीनेही पहिला सेट गमावल्यानंतर इक्वेडोर जोडी गोन्झालो एस्कोबार आणि दिएगो हिडाल्गो यांचा 5-7, 6-3, 12-10 असा पराभव करत आगेकूच केली. आता त्यांचा उपांत्य फेरीतील सामना इव्हान डोडिज (क्रोएशिया) आणि राफेल माटोस (ब्राझील) या दुसऱ्या मानांकित जोडीशी होणार आहे.





