पुणे जिल्हा | अत्याचार करणार्यांना फासावर लटकवा

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – देशातील महिला, लहान मुलींवर अत्याचार करणार्यांची नावे बदलत राहिली; मात्र अत्याचार करणारे हात मात्र समांतर राहिले आहेत. अत्याचार करणार्यांना तात्काळ फासावर लटकवा.
राज्यात लहान मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत असताना त्याकडे दुर्लक्ष करणार्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी त्वरित राजीनामे द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षा अॅड. राजमाला बुट्टे पाटील यांनी राजगुरूनगर येथे केली.
देशातील महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आणि कोलकत्ता बदलापूर येथील अमानुष घटनांचा निषेध करण्यासाठी राजगुरूनगर येथे शनिवारी (दि. 24) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडीच्या वतीने तोंडाला, हाताला काळ्या फिती बांधून आंदोलन करण्यात आले. यावेळी अॅड. राजमाला बुट्टे पाटील बोलत होत्या.
यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा महिला संपर्क प्रमुख विजया शिंदे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तथा पुणे जिल्हा भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष विजय डोळस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष हिरामण सातकर, युवक अध्यक्ष अॅड. देविदास शिंदे, जिल्हा सरचिटणीस डॉ. नीता आल्हाट, जिल्हा उपाअध्यक्ष मनीषा सांडभोर,
खेड तालुका कार्याध्यक्ष संध्या शिंदे, मी सेवेकरी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुधीर मुंगसे, शिवसेना राजगुरुनगर शहर महिला प्रमुख उर्मिला सांडभोर, नीलिमा राक्षे, शीतल थिगळे, उषा बोर्हाडे, संगीता होरे,
ज्योती अमराळे, अलका जोगदंड, ज्ञानेश्वर भोसले, सुदाम कराळे, हरीप्रसाद खळदकर, तन्मय पाचारणे, आकाश बर्गे, अशोक जाधव, प्रशांत गोरे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बदलापूर घटनेत आरोपीना पाठीशी घालण्याचे काम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करीत आहेत. लाडकी बहीण योजना काढली मात्र लहान मुलींवर अत्याचार करणार्यांना न्याय मिळत नाही. राज्यात अशा घटना कदापि सहन केल्या जाणार नाहीत. – विजय डोळस, अध्यक्ष, काँग्रेस, खेड तालुका





