मुंबई – अभिनेत्री मंदिरा बेदीने विकेण्डला प्रेरणादायी पोस्ट करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. विकेण्ड म्हटले की आराम, झोप या गोष्टी डोळ्यांसमोर येतात. अशातच मंदिराने सध्याच्या घडीला आवश्यक असलेली प्रेरणादायी पोस्ट केली आहे.
View this post on Instagram
मंदिराने चाहत्यांना सकाळच्या शुभेच्छा देत त्यासंदर्भातील एक व्हिडीओदेखील इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये मंदिरा हॅंडस्टॅंड करताना दिसत आहे.
View this post on Instagram
मंदिराने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना थक्क केले आहे. मंदिराने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, तिने सलग 33 हॅंडस्टॅंड केले आहेत. त्यातील 11 हॅंडस्टॅंड एकापाठोपाठ एक केले होते. मंदिराने नेहमीच फिटनेसबाबत चाहत्यांना प्रेरित करत असते.
View this post on Instagram
तिने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असतो. मंदिराने शेअर केलेल्या हॅंडस्टॅंडचा व्हिडीओलादेखील चाहते कमेंट्स करत शुभेच्छा देत आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, मंदिराचा योगा, सूर्यनमस्कार घालतानाचा व्हिडीओदेखील चाहत्यांच्या पसंतीस पडला होता. “दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटासाठी आजदेखील मंदिरा ओळखली जाते. तसेच “खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमानंतर मंदिराने फिटनेसकडे जास्त लक्ष केंद्रीत केले आहे.





