भोर महावितरणकडून मदतीचा हात
Updated On:
भाटघर – सांगली, कोल्हापूर पूरग्रस्तांनासाठी भोर महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे साहित्य जमा केले आहे.
सदर साहित्य पुणे येथील महाराष्ट्र देशा फाउंडेशन या सेवाभावी संस्थेमार्फत चंदगड येथे वितरित केले जाणार आहे. यासाठी महावितरण उपविभाग भोर येथील उपकार्यकारी अभियंता संतोष चव्हाण, सहाय्यक अभियंता योगेश नायकवडी, केशव बांदल, ठेकेदार मारुती कंक, विश्वनाथ किंद्रे यांनी विशेष प्रयत्न केले.





