Han Seong-sook: दक्षिण कोरियाला मिळणार दुसरी महिला पंतप्रधान; हान सेओंग-सूक यांची नियुक्ती निश्चित
Han Seong-sook: दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे-म्युंग यांनी विद्यमान लघु आणि मध्यम उद्योग मंत्री हान सेओंग-सूक यांची देशाच्या नव्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

Han Seong-sook: दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे-म्युंग यांनी विद्यमान लघु आणि मध्यम उद्योग मंत्री हान सेओंग-सूक यांची देशाच्या नव्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. अध्यक्षांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.
संसदेची मंजुरी मिळाल्यानंतर हान सेओंग-सूक या ली सरकारच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरतील. तसेच २००६ ते २००७ या कालावधीत पंतप्रधान राहिलेल्या Han Myeong-sook यांच्यानंतर या पदावर विराजमान होणाऱ्या त्या दक्षिण कोरियाच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान असतील.
सध्याचे पंतप्रधान किम मिन-सियोक हे सत्ताधारी कोरियाचा डेमोक्रॅटिक पक्षाच्या आगामी अधिवेशनात पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये ते पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
इंटरनेट उद्योगातील दीर्घ अनुभव असलेल्या हान सेओंग-सूक या दक्षिण कोरियातील आघाडीची तंत्रज्ञान कंपनीच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ली प्रशासनाच्या सुरुवातीपासूनच त्यांनी लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली आहे. Han Seong-sook:
दरम्यान, अध्यक्ष ली जे-म्युंग यांनी विद्यमान पंतप्रधान किम मिन-सेओक यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सरकारच्या विविध धोरणात्मक यशामागे किम यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्ष ली यांच्या शपथविधीला एक वर्ष पूर्ण होत असताना हा महत्त्वाचा मंत्रिमंडळ फेरबदल करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात दक्षिण कोरियाच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





